शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आझाद बागेची वादग्रस्त निविदा अखेर रद्द

By admin | Updated: October 25, 2015 00:48 IST

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या आझाद बागेच्या नूतनीकरणाचे कंत्राट गतवर्षभरापासून गाजत असताना

स्थायी समितीच्या सभेत निर्णय : फेरनिविदा मागविण्यासाठी हालचाली सुरूचंद्रपूर : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या आझाद बागेच्या नूतनीकरणाचे कंत्राट गतवर्षभरापासून गाजत असताना अखेर या कंत्राटाच्या निविदाच रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी पार पडलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. गत काही दिवसापासून गाजत असलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद बगिचाला विकसित करण्याच्या कामाच्या निविदेला काही दिवसांपूर्वी मनपा सदस्य असलेल्या सहा सदस्यीय समितीने स्थगिती दिली होती. देखभाल दुरुस्ती ही बगीचा विकसित केल्यानंतरची बाब असल्याने त्याची वेगळी निविदा काढण्यात यावी, असे मत समितीने व्यक्त केले होते. मौलाना अब्दुल कलाम आझाद बगिचा विकसित करण्याच्या कामासा प्राप्त झालेल्या निविदेवर विश्लेषण करुन अहवाल सादर करण्यासाठी नगरसेवक दुर्गेश कोडाम यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती तयार करण्यात आली. यात दुर्गेश कोडाम, ऐस्तेर शिरवार, राजेश अडूर, राजकुमार उके, नंदू नागरकर व प्रवीण पडवेकर यांचा समावेश होता. समितीने स्थायी समिती सभापती यांना सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे की, आझाद बगिचा विकसित करणे व देखभाल करण्याच्या निविदेकरिता आलेल्या आक्षेपावर समितीच्या निर्णयानुसार व कार्यालयातर्फे पुरविण्यात आलेल्या कागदपत्रानुसार असे लक्षात येते की, कार्यालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या निविदेत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित मजकुरात देखभालीबाबतचा मुद्दा प्रकाशित झाला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नगरसेवक नंदू नागरकर यांनी घेतलेल्या आक्षेपाला अमान्य करता येत नाही. समितीद्वारे सदर प्रकरणी सविस्तर तपासणी करण्यात आली आणि पारदर्शकता ठेवण्याच्या दृष्टीने वृत्तपत्रात प्रकाशित मजकुरामध्ये देखभाल शब्द घेऊन फेरनिविदा प्रकाशित करावी व इ निविदामध्ये बागेचा सविस्तर क्षेत्रफळ दर्शविणारा तक्ता जोडण्यात यावा, असेसुद्धा ठरविण्यात आले. देखभाल दुरुस्ती ही बगिचा विकसित केल्यानंतरची बाब असल्याने त्याची वेगळी निविदा काढण्यात यावी, असे ठरले. (शहर प्रतिनिधी)