शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:30 IST

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासकीय रुग्णालय, महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता करा : मोर्चानंतर ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासकीय रुग्णालय, महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच चंद्रपूर महानगर पालिकेतील सेंटर फॉर डेव्हलपमेंट अ‍ॅड कम्युनिकेशन, उज्ज्वल कन्स्ट्रक्शन, आर.सी.एचचे कंत्राटी कामगार, कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते. गांधी चौक येथून दुपारी २ वाजता मोर्चाला सुरुवात करण्यात आली.मोर्चात सहभागी झालेल्या महिला व पुरुष कामगारांनी यावेळी शासन प्रशासन व अन्याय करणाऱ्या कंत्राटदाराच्या विरोधात नारेबाजी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आंदोलनाची ही श्रृंखला कायम राहणार, असा इशारा जन विकासचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख व कामगारांनी दिला.अशा आहेत मागण्याविशेष म्हणजे, मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तसेच महानगर पालिकेतील शेकडो कंत्राटी कामगारांचे पगार वारंवार थकित राहतात. कंत्राटी कामगारांना ‘मिनीमम वेजेस’ देण्यात येत नाही. कंत्राटी कामगारांचे थकित पगार तातडीने देण्यात यावे, नियमानुसार केवळ आठ तास काम देण्यात यावे, वेज अ‍ॅक्टचे पालन करून दर महिन्याला दहा तारखेच्या आत नियमित पगार देण्यात यावे, कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू करण्यात यावे, पेमेंट व पीएफ स्लिप देण्यात यावी, नियमानुसार सुटया लागू करण्यात याव्या, महिला कंत्राटी कामगारांना प्रसुति रजा देण्यात यावी, कामगारांना सुरक्षेची साधने पुरविण्यात यावी, कामगारांशी अपमानास्पद व अश्लील भाषेत बोलणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी,आपल्या न्याय हक्कासाठी कामगार संघटनेत सहभागी होणाऱ्या कंत्राटी कामगारांवर व्यवस्थापनाकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येतो. अशा व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई कामगार विभागातर्फे करण्यात यावी तसेच कंत्राटदारांची देयके प्रलंबित ठेवणाºया शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात यावी इत्यादी मागण्या यावेळी रेटून धरण्यात आल्या.