शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी महाभरती बेरोजगारांची थट्टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:35 IST

शासनातर्फे नुकतीच ७२ हजार पदभरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. मात्र आता ही पदभरती बाह्ययंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया युवकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

ठळक मुद्देभरतीबाबत युवकांमध्ये नाराजी : पूर्वीप्रमाणे सरळसेवा भरती राबवावी

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनातर्फे नुकतीच ७२ हजार पदभरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. मात्र आता ही पदभरती बाह्ययंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया युवकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.मागील काही वर्षांपासून नोकरभरती बंदी असल्यामुळे बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. मात्र आज ना उद्या भरती प्रकिया सुरु होईल, म्हणून बेरोजगार युवक, युवती मोठ्या अपेक्षेने स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत.त्यातच शासनातर्फे दोन टप्प्यात विविध विभागातील पदभरती राबविण्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर सदर पदभरतील ७० टक्के पदे बाह्ययंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार नाही. त्यासोबतच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाºयांच्या नियुक्त्याही करार पद्धतीने विशिष्ट कालावधीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आस असलेल्या बेरोजगारांचे स्वप्न भंगले असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नोकरभरतीसाठी विशेष पाऊले उचलण्याची गरज असताना शासनाकडून केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारांची थट्टा करण्यात येत असल्यामुळे बेरोजगारांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.रिक्त पदांचा आकृतीबंध नसल्याने तात्पूरती भरतीविविध विभागातील रिक्त पदांचा आकृतीबंध तयार करण्याच्या सूचना शासनाने संबंधित विभागाला दिल्या होत्या. मात्र मोजक्याच विभागांनी रिक्त पदांचा आकृतीबंध तयार केला आहे. त्यामुळे रिक्त पदांमुळे कामकाजात व्यत्यय येऊ नये, म्हणून बाह्ययंत्रणेमार्फत भरती प्रकिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र विविध कर्मचारी संघटनांनी रिक्त पदांमुळे अतिरिक्त कामाचा ताण कर्मचाºयांवर पडत असल्याच्या तक्रारी अनेकदा केल्या आहेत. मात्र तरीसुद्धा आकृतीबंध तयार नसल्याचे कारण पुढे करणे, म्हणजेच बेरोजगारांची थट्टाच आहे. असा आरोपही बेरोजगारांकडून होत आहे.शासनाचा संबंध नसणारनोकरभरतीचा टेंडर एखाद्या खासगी कंपणीला देण्यात येणार आहे. त्यानुसार पात्रताधारकांना नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. मात्र यामध्ये शासनाचा कोणताही संबंध राहणार नाही. कंपणीतर्फेच वेतन देण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय नोकरी व खासगी नोकरी यामध्ये कोणता फरक आहे, असा प्रश्न बेरोजगारांकडून विचारण्यात येत आहे.एखाद्या खासगी कंपनीला कंत्राट देताना भ्रष्टाचार होणार नाही का, यातून सरळ आपल्या मर्जीतल्या लोकांचीच ते नेमणूक करणार. कंत्राटी पदभरती तात्पुरती असली तरी किती वर्षांकरिता नेमणुका होणार आहेत.याने सरकारला काहीही फरक पडणार नाही. मात्र शासकीय नोकरीचे उद्दिष्ट्य समोर ठेऊन आपली बुद्धी, पैसा, वेळ दावणीला बांधून असलेल्या लाखो बेरोजगारांना नक्कीच फरक पडेल. कित्येकांना ही शेवटची संधी असू शकते.- शांतीभूषण बोरकर, स्पर्धा परीक्षार्थी