शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

खडकीतील कोलाम पितात दूषित पाणी

By admin | Updated: March 4, 2016 00:59 IST

गावात जेमतेम माणसं. सगळ्याचीच हलाखीची स्थिती, शेतीच्या आधाराने जीवन जगणाऱ्या कोलामांना प्यायलाही शुद्ध पाणी नाही.

ग्रामपंचायतीचे ढिसाळ नियोजन : नागरिकांना विविध आजारांची लागणशंकर चव्हाण जिवतीगावात जेमतेम माणसं. सगळ्याचीच हलाखीची स्थिती, शेतीच्या आधाराने जीवन जगणाऱ्या कोलामांना प्यायलाही शुद्ध पाणी नाही. दूरध्वनी सेवा तर सोडा साधी बाजारपेठेत जायला रस्त्याचीही सोय नाही. आरोग्यांची काळजी घेणारे कर्मचारीही गावात कधी येत नाही. ही व्यथा आहे, खडकी रायपूर ग्रामपंचायतीमधील खडकी गुड्याची.स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे निघून गेली. सत्ता बदलली लोकप्रतिनिधी बदलले. पण गुड्यातील समस्या सुटल्या नाही. आजही कोलामांना पाणी असूनही ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे दूषित पाणी प्यावे लागत असल्याची वास्तविकता लोकमतने आॅन द स्पॉट भेट देऊन समोर आणली आहे.केवळ १२ घरांची वस्ती. जेमतेम ५०-५५ जण गुड्यात वास्तव्यास असून संपूर्ण कुटुंबच दारिद्र्य रेषेखाली हलाखीचे जीवन जगत आहे. या छोट्याशा गुड्यात शिक्षणाचे प्रमाणही कमी आहे. दहावीपर्यंत चार तर बारावीपर्यंत एका मुलीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. कर्णू उत्तम मडावी हा युवक सन २०१२-१३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात पोलीस म्हणून लागला आहे. तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आणि खडकी रायपूर असे ग्रामपंचायतीचे नाव असले तरी खडकीचा विकास मात्र अजून झालेला दिसत नाही. सुरुवातीला ७० घराची वस्ती या गुड्यात होती. पिढ्यानपिढ्या एकोप्याने राहणारा समाज समस्याला कंटाळून विखुरला गेला. आजघडीला या गुड्यात फक्त १२ घराची वस्ती आहे. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही गावात जायला धड रस्ता नाही. वाहन गावात कधी आले नाही. गुड्यातील लोकांना येण्याजाण्याकरिता सोयीचे व्हावे, यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याची कामे केली. पण काही दिवसात रस्त्याची वाट लागली आहे. विहिरीची संरक्षण भिंत पडलीयेथील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे, यासाठी जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत विहिरीचे बांधकाम झाले. संबंधित अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटदार विहिरीचे काम काळ्या रेतीने थातूर-मातूर करुन मोकळे झाले. अनेक वेळा तक्रारी दिल्या. मात्र कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे वर्षभरातच विहिरीची संरक्षण भिंत पडली. आजही ती तशीच असून काही ठिकाणी भगदाड पडले आहे. त्यावर नागरिकांनी बचावासाठी दगडाचे ढिगळ बसवल्याचे दिसून आले. ही विहीर नागरिकांसाठी धोकादायकच आहे. पिण्याचे पाणीही झाले लालविहीर धोकादायक असतानाही त्याच विहिरीवरुन पाणी पिण्यास न्यावे लागते. कारण शाळेसमोर असलेला हातपंप दोन वर्षापूर्वी बंद पडला आहे. अनेकवेळा तक्रारी केल्या. पण कुणीच लक्ष दिले नाही. विहीर धोकादायक तर आहेच; पण त्यातील पाणीही आता खराब झाले आहे. विहीर नाल्यालगत असल्याने काही ठराविक दिवसात पाण्याचा उपसा व नियमित ब्लिचिंग पावडर टाकणे आवश्यक आहे. मात्र असे होत नसल्याने नागरिकांना लाल पाणी प्यावे लागते.