शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधाचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केवळ 16.28 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 05:00 IST

२३ फेबुवारीपर्यंत ग्रामीण व शहरी भागात १३ हजार ९६५ आणि चंद्रपूर मनपा क्षेत्रात ८ हजार ७३५ असे एकूण २२ हजार ७०० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहर, ग्रामीण व चंद्रपूर मनपा क्षेत्रात एक लाख ५३ हजार ९४ व्यक्ती अति जोखमीच्या, तर कमी जोखमीच्या संपर्कात दोन लाख १६ हजार ४६५ असे एकूण ३ लाख ६९ हजार ५५९ व्यक्तींची नोंद करण्यात आली. या दोनही गटांतील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर १६. २८ टक्के आहे.

ठळक मुद्देएक लाख ५३ हजार ९४ हजार व्यक्ती अतिजोखमीच्या संपर्कात

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाच्या निर्देशानुसार, कोरोना प्रतिबंधासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग २० टक्क्यांपेक्षा जास्त असावा लागतो. मात्र, जिल्ह्यात मंगळवार(दि. २३) पर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग दर केवळ १६.२८ टक्के आहे. एक लाख ५३ हजार ९४ हजार व्यक्ती अतिजोखमी (हाय रिस्क)च्या संपर्कात असल्याची नोंद झाली. त्यामुळे  बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या अधिकाधिक चाचण्या करण्यासाठी प्रशासनाला जलद गतीने पाऊल उचलावे लागणार आहे. अन्यथा, संसर्ग वाढून बाधितांच्या संख्येत झपाट्याने भर पडण्याचा धोका आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली तर त्याच्या संपर्कातील सर्वांची चाचणी करून कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या प्रक्रियेला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असे म्हटले जाते. २३ फेबुवारीपर्यंत ग्रामीण व शहरी भागात १३ हजार ९६५ आणि चंद्रपूर मनपा क्षेत्रात ८ हजार ७३५ असे एकूण २२ हजार ७०० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहर, ग्रामीण व चंद्रपूर मनपा क्षेत्रात एक लाख ५३ हजार ९४ व्यक्ती अति जोखमीच्या, तर कमी जोखमीच्या संपर्कात दोन लाख १६ हजार ४६५ असे एकूण ३ लाख ६९ हजार ५५९ व्यक्तींची नोंद करण्यात आली. या दोनही गटांतील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर १६. २८ टक्के आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी   जिल्हा आरोग्य प्रशासनाला तातडीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावा लागणार आहे.  

१९ ते ४० वयोगटात सर्वाधिक बाधितमंगळवारी जारी केलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात एक ते पाच वयोगटात ३८७, सहा ते १८ वयोगटात एक हजार ९४३, १९ ते ४० गटात १० हजार ७७, ४१ ते ६० वयोगटात ८ हजार १५० आणि ६१ वर्षांवरील गटामध्ये दोन हजार ८८० असे एकूण २३ हजार ४३७ व्यक्ती कोरोना बाधित झाले आहेत.

केस १अमरावती शहरातील नातेवाइकांशी संपर्कात आल्याने बाधित झालो. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने माझ्या कुटुंबातील चौघांची अ‍ॅन्टीजेन चाचणी केली.  परंतु, सर्वजण निगेटिव्ह आले. काही मित्र संपर्कात आले होते. त्यांचीही चाचणी व्हायला पाहिजे.

केस २मी हाय रिस्क गटात येतो. मुलांनी खबरदारी म्हणून लगेच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. पॉझिटिव्ह आल्याने गृहविलगीकरणात आहे. कुठून बाधा झाली, याची माहिती नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाल्यास बाधित आढळतील. 

केस ३जे व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनीच चाचणी केली. संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती घेऊन  आरोग्य विभागाने कोविड १९ चाचणी केली नाही. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या