शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

खासगी जागेत ओट्यांचे बांधकाम

By admin | Updated: February 27, 2016 01:28 IST

संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पांतर्गत आठवडी बाजार विकास योजनेचे काम मंजूर झाले.

चंदनखेडा येथील प्रकार : मोजणीनंतर जागा मालकाने रोवले खांबचंदनखेडा : संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पांतर्गत आठवडी बाजार विकास योजनेचे काम मंजूर झाले. सदर काम आदर्शपणे व्हावे यासाठी नियुक्त बाजार समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, काही आदिवासी समाज बांधव तसेच लगतच्या शेतजमीन मालकांनी जागा मोजणी करुन बाजाराचे ओटे बांधण्यासाठी ठराव घेतला. त्यानंतर ग्रामपंचायतीला अर्ज सादर केला. मुजोरीने सुरू असलेले काम बंद करण्याचा प्रयत्न केला असता, सरपंच गायत्री बागेसर यांच्या आशीर्वादाने कंत्राटदाराने काम सुरूच ठेवले. याच दरम्यान लगतच्या शेतजमीन मालकांनी केलेल्या शासकीय मोजणीत बाजाराचे बांधलेले काही ओटे हे त्यांच्या हद्दीत बांधण्यात येत असल्याचे उजेडात आले आहे. यामुळे संबंधित व्यक्तीचे धाबे दणाणले असून केलेली मुजोरी अंगलट आल्याने आता सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न कंत्राटदाराला सोबत घेऊन काही संबंधित हितचिंतक करताना दिसत आहे.सरपंच तसेच त्यांच्या नातलगांचे बाजाराचे जागेवर अतिक्रमण असल्याने त्याची झळ आपणास बसू नये तसेच आर्थिक हित जोपासण्यासाठी अनेक क्लुप्त्या वापरुन मोजणी न करता काम सुरू केले होते. परंतु काही त्रुट्यामुळे बाजार विकास समिती तथा नागरिकांनी काम बंद पाडून योग्य पद्धतीने काम व्हावे अशी सूचना केली असता सरपंनाच्या आशिर्वादाने कंत्राटदाराने मुजोरीने काम सुरूच ठेवले. या जागेलगतच दक्षिणेस भू.मा.क्र. ३९/१ क्षेत्र ०.२६ आर ही जमीन किसन रामाजी धकाते यांच्या वारसदाराची नावे असून मागील क प्रत नुसार त्यांच्या जमिनीचा काही भाग बाजार जागेत येत असल्याने त्यांनी सरकारी मोजणी होईपर्यंत बांधकाम थांबवावे, असे निवेदन १० फेब्रुवारी रोजी ग्राम पंचायतीला दिले असतानाही बांधकाम सुरू ठेवले होते. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाद्वारा २१ फेब्रुवारीला उउपसरपंच व सरपंचाचे पती व इतरासमक्ष मोजणी झाली असता धकाते यांच्या जागेवर बाजाराचे काही ओटे बांधकाम आलेत. त्यामुळे २२ फेब्रुवारीला धकाते यांनी मोजणीनंतर निश्चित झालेल्या जागेवर सिमेंट पोल गाडून आपली हद्द निर्धारित करीत असताना सरपंचांनी अटकाव गेला व पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची त्यांना धमकीही दिली. त्यानंतर धकाते यांनी केलेल्या अतिक्रमणा संदर्भात जागा मोकळी करून देण्याबाबत ग्राम पंचायतीला निवेदन दिले.(वार्ताहर)