शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे बांधकाम तीन महिन्यांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:43 IST

केंद्र सरकारने उमरेड-चिमूर-वरोरा क्रमांक ३५३ (इ) या राष्ट्रीय महामार्गाचे ेचौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले. पण मागील तिन महिन्यांपासून काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना जीव धोक्यात घालून या मार्गावरून जावे लागत आहे.

ठळक मुद्देवाहनधारक हैराण । तातडीने बांधकाम पूर्ण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : केंद्र सरकारने उमरेड-चिमूर-वरोरा क्रमांक ३५३ (इ) या राष्ट्रीय महामार्गाचे ेचौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले. पण मागील तिन महिन्यांपासून काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना जीव धोक्यात घालून या मार्गावरून जावे लागत आहे.उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दोन मोठ्या कंपन्याना होते. यापैकी उमेरड- चिमूर मार्गचे काम स्थितीत सुरू आहे. परंतु, चिमूर-वरोरा मार्गाचे काम रखडल्याचे दिसून येत आहे. चिमूर- वरोरा हा मार्ग पूर्णत: खोदण्यात आला. या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. पण मागील दीड वर्षाच्या काळात या मार्गाची एक बाजूही तयार करण्यात संबधित यंत्रणेला यश आले नाही. बांधकाम सुरू असताना त्यावर पाणी मारण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकााां मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यावर पसरविण्यात आलेल्या गिट्टीमुळे दररोज अपघात घडत आहेत. यामध्ये आतापर्यंत अनेकांना अपंगत्व आले. मार्गाच्या बांधकामाचे कंत्राट वारंवार विविध कंपन्यांना हस्तांतरीत केल्या जाते. मागील तीन महिन्यांच्या काळापासून बांधकाम प्रक्रिया पूर्णत: ठप्प आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले. शिवाय लोकप्रतिनिधीही बघ्याची भूमिका घेत असल्याने वाहनधारक व परिसरातील विविध गावांतील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. उमरेड- चिमूर -वरोरा हा मार्ग अतिशय वर्दळीचा असल्याने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. मार्गाचे चौपदरीकरण व अन्य कामे पूर्ण झाली असती तर विकासाला चालना मिळाली असती. पण मागील तीन महिन्यांपासून बांधकाम जैसे थे आहे. त्यामुळे महामार्गाच्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता आशिष आवळे यांच्याशी संपर्क साधला परंतु होऊ शकला नाही.रुग्णांसाठी धोकादायकचिमूर तालुक्यात आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने रूग्णांना चंद्रपूर व नागपूर येथे दाखल करावे लगाते. गर्भवती महिलांना याचा सर्वाधिक फटका बसतो. या मार्गावर जागोजागी खड्डे असल्यामुळे रुग्णालयात पोहोचताना संकटांचा सामना करावा लागतो. प्रशासनाने चौपदीकरणाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग