शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारणार

By admin | Updated: November 15, 2014 22:44 IST

आगामी पाच वर्षामध्ये जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारून जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात रसायन व खते

गांधी चौकात जनसागर उसळला : हंसराज अहीर यांचे सत्काराला उत्तरचंद्रपूर : आगामी पाच वर्षामध्ये जिल्ह्यात खतनिर्मिती कारखाना उभारून जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात रसायन व खते राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी सोपविवली. त्या संधीचे सोने करून शेतकऱ्यांना या विभागामार्फत कसा लाभ देता येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत ना.हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यानंतर प्रथमच ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचा गांधी चौकात भव्य सत्कार करणार आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अतुल देशकर, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, आमदार राजू तोडसाम, आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, माजी पालकमंत्री संजय देवतळे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपाचे महानगराध्यक्ष विजय राऊत, राजेश मून, राजेंद्र अडपेवार, चंद्रकांत गुंडावार आदी उपस्थित होते.मतदारांनी चार वेळा लोकसभेत पाठविले. त्यामुळेच मंत्रीपदाची संधी मिळाली. मला मिळालेल्या मंत्रीपदाचे श्रेय हे माझे नाही तर, मतदारांचे आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर नागरिकांनी काँग्रेसचे सरकार उलथवून भाजपाकडे सत्ता सोपविली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त देश निर्माण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. देशातील सर्वात मोठा कोळसा घोटाळा बाहेर काढल्यामुळे नागरिकांकडून माझ्या अपेक्षा वाढत्या आहेत. त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माझ्याकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी महानगर भाजपातर्फे पुष्पहार घालुन ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर महानगररातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने सत्कार केला. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( नगर प्रतिनिधी)