शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलाचे बांधकाम तीन वर्षांपासून रखडलेलेच

By admin | Updated: February 26, 2016 01:08 IST

महाराष्ट्र शासन व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या भागीदारीतून सुमारे तीन वर्षांपासून राजुराजवळील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे.

आवागमनाचा एकमेव मार्ग : अभियंता, कंत्राटदाराचे दुर्लक्षराजुरा : महाराष्ट्र शासन व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या भागीदारीतून सुमारे तीन वर्षांपासून राजुराजवळील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. त्यातच सहा महिन्यांपासून बांधकाम पूर्णपणे ठप्प आहे. याच पद्धतीने बांधकाम सुरू राहिल्यास पुन्हा दोन-तीन वर्षांत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा फटका व त्रास सामान्य नागरिकांना व वाहन चालकांना सोसावा करावा लागत आहे.माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अथक प्रयत्नाने उड्डाण पुलाची मंजुरी व बांधकाम सुरू झाले होते. या बांधकामाचा खर्च महाराष्ट्र शासन व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या भागीदारीतून होत आहे. नागपूरपासून दक्षिणकडील राज्यात आवागमनाचा एकमेव मार्ग आहे. दररोज हजारो ट्रक या मार्गाने जाणे-येणे करतात. मात्र या मार्गावरील रेल्वे गेट १० मिनीटात बंद होते. गेट उघण्यासाठी २०- २५ मिनीटे वाट पाहावी लागते. त्यामुळे आम जनतेस व वाहन चालकांना गेट उघडण्याची वाट पाहत त्रास सहन करावा लागत आहे.तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटात उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. दोन वर्षांत पुलाचे बांधकाम करण्याचा करार करण्यात आला होता. परंतु अद्यापही बांधकाम अपूर्ण आहे. या बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियत्याची देखरेख आहे. कंत्राटदाराकडून वेळेवर बांधकाम करून घेण्याची जबाबदारी अभियंत्याची आहे. बांधकामाचा कालावधी पाहून अभियंता व कंत्राटदार कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. बांधकामाचा जागेवर विवरण फलक लावणे आवश्यक आहे. तशी तरतुद नियमात आहे. परंतु अभियंता व कंत्राटदार आपला बचाव करण्यासाठी फलक लावणे टाळत आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. याच पद्धतीचे बांधकाम सुरू राहिल्यास उड्डाण पूल पूर्ण होण्यास दोन-तीन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)