शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संविधान जन्माला आले, ही महत्त्वाची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:17 IST

१९४७ ला नव्या देशाचा उदय झाला. शेती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान यांच्यात नव्या भारतीय मागण्या केल्या गेल्या. गेल्या सत्तर वर्षात प्रगती झाली पण यात भ्रष्टाचार आला.

ठळक मुद्देराजन खान : राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा समारोप

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : १९४७ ला नव्या देशाचा उदय झाला. शेती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान यांच्यात नव्या भारतीय मागण्या केल्या गेल्या. गेल्या सत्तर वर्षात प्रगती झाली पण यात भ्रष्टाचार आला. आज कुठल्याही क्षेत्राच्या बाबतीत आपण सुखी नाही. शिक्षणात अक्कल नाही, खरे आरोग्य नाही. मातीत राबणारा मरतो आहे, हे दुर्दैव आहे. निवडणुका हिंदू अन् मुसलमान अशा होतात. सत्तर वर्षात आपण भारतीय होऊ शकलो नाही. हिंदूराष्ट्र कशासाठी, भारत राष्ट्र कुणी मागतो का? माझं देशावर प्रेम आहे. या देशात संविधान जन्माला आले, ही अत्यंत महत्त्वाची घटना. पण संविधान पाळलं जात नाही, हे दु:ख आहे. धर्मामधला पैसा काढा. श्रद्धा मनात पाहिजे. जे लोक जात, पंथ पाळतात, ते संविधानविरोधी लोक होत, असे सडेतोडपणे मत संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिध्द साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले.सूर्यांस साहित्य मंच आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.या दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी विचारपीठावर कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ‘बिऱ्हाड’कार अशोक पवार, सूर्यांशचे अध्यक्ष कवी इरफान शेख, स्वागताध्यक्ष तनुजा बोडाले, कार्याध्यक्ष डॉ. विद्याधर बन्सोड, संजय वैद्य, सीमा भसारकर उपस्थित होते. यावेळी डॉ. शोभणे म्हणाले, छोटी संमेलने व्हावीत, याचा मी पाईक आहे. असे सांगून सूर्यांश टीमचे स्वागत केले. अशोक पवारांनी धर्माचे धर्मांतर इतके वेळा व्हावे की माणूस मोठा व धर्म लहान व्हावा. आपण भयानक धावत आहोत. पुस्तकं निघाली पाहिजेत. त्यातून माणसं उभी राहतात.संचालन उपाध्यक्ष सीमा भसारकरांनी तर आभार सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख यांनी मानले. याप्रसंगी सचिव प्रदीप देशमुख, प्राचार्य डॉ. इंगोले, निता कोंतमवार, गीता रायपुरे, कोषाध्यक्ष रंगनाथ रायपुरे, प्रभाकर धोपटे, किशोर तेलतुंबडे, संगिता पिजदूरकर, डॉ. धनराज खानोरकर, डॉ. विजय सोरते, प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, विवेक पत्तीवार, देवानंद साखरकर आदी उपस्थित होते. यावेळी रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.