तळोधी (बा.) : तळोधी (बा.) तालुका निर्मितीकरिता ग्रामीण पत्रकार संघ तळोधी (बा.) च्या पुढाकारातून ५५ गावांतील लोकांची बैठक झाली. तळोधी (बा.) तालुक्यासाठी शासनाने अहवाल मागितला. परंतु अद्यापर्यंत घोषणा केली नाही. सर्वपक्षीय बैठकीत व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदू भरडकर यांच्या अध्यक्षतेखाली साई मंदिर देवस्थान येथे बैठक घेण्यात आली. तळोधी (बा.) तालुका निर्माण कृते समिती गठित करण्यात आली. समितीत एक मुख्य संयोजक,पाच उपाध्यक्ष, एक सचिव, एक कोषाध्यक्ष व तळोधी (बा.) परिसरातील सर्व सरपंच व बैठकीला उपस्थित असणारे सर्व सदस्य घेण्यात आले. त्यात मुख्य संयोजक म्हणून ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव संजय अगडे यांची निवड करण्यात आली. तर कृती समितीचे नवनियुक्त अध्यक्ष वसंतराव बडवाईक, उपाध्यक्ष रुपेश डोर्लीकर, रवी पर्वते, विनोद बोरकर, धनराज रामटेके, राहुल रामटेके, सचिव दिनकर पाकमोडे व कोषाध्यक्ष म्हणून प्रा. उपेन्द्र चिटमलवार तसेच विशेष निमंत्रितांमध्ये विद्यमान जि.प. सदस्य व पं. स. सदस्य, सर्व सरपंच यांची निवड करण्यात आली. संचालन ईश्वरकुमार कामडी यांनी व आभार प्रा. दिवाकर कामडी यांनी केले. (वार्ताहर)
तळोधी तालुका कृती समितीचे गठन
By admin | Updated: September 2, 2016 01:01 IST