शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे व्यवहार नीट चालण्यासाठी संविधान निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:18 IST

भारताचे व्यवहार नीट चालण्यासाठी संविधान निर्मिती झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकांनी कायद्याच्या चौकटीतच व्यवहार केले पाहिजे.

ठळक मुद्देपाथर्डे यांचे प्रतिपादन : कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारताचे व्यवहार नीट चालण्यासाठी संविधान निर्मिती झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकांनी कायद्याच्या चौकटीतच व्यवहार केले पाहिजे. कुटुंबातून बालकांवर हिंसाचार वाढत चाललेले आहे. अशा वेळेत न्याय मागून बालके सुरक्षित होऊ शकतात, असे प्रतिपादन अ‍ॅड. पाथर्डे यांनी केले.चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरद्वारा संचालित जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथील राष्टÑीय सेवा योजना विभाग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या सभागृहात कायदेविषयक शिबिर पार पडले. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. के. सी. धानोरकर होते. तर मंचावर दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) तथा जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे प्रभारी सचिव सी. आर. बलवानी, राष्टÑीय सेवा योजना अधिकारी डॉ. मिलिंद जांभूळकर, अ‍ॅड. वर्षा जामदार, अ‍ॅड. पाथर्डे, महिला सेलच्या अध्यक्षा डॉ. अनिता हुडा, डॉ. वाय. वाय. दुधपचारे उपस्थित होते.१८ वर्षाखालील बालक तर त्यावरील प्रौढ, असा कायद्याने भेद केलेला आहे. कुटुंबातील बालके बिघडू नये, असे प्रयत्न केले पाहिजे. बालकांना सर्व संधी मिळाल्या पाहिजे. न्यायाच्या संघर्षात सापडलेला बालक सामाजिक परिस्थितीचा बळी असतो, असे मत अ‍ॅड. वर्षा जामदार यांनी बालकांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्त केले.बेटी बचाओ, बेटी पढाओ, या विषयावरील ‘मुझे आवाज उठाने दो’ ही प्रेरणादायी कविता सी. आर. न्यायाधीश बलवाणी यांनी उपस्थितांना ऐकविली. मुले वडीलांच्या विरोधात संपत्तीसाठी केस दाखल करतात. मात्र मुली तसे करीत नाही. जी स्त्री जगाचा उध्दार करते, तिला गर्भात मारणे, भ्रृण हत्या करणे कितपत चांगले आहे ?या मार्गदर्शन शिबिराला एकाही व्यक्तीने सकारात्मक प्रतिसाद दिला तर या शिबिराची यशस्वीता ठरेल, असे मत व्यक्त केले.