शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

फायद्यातोट्याचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:41 IST

मोबाईल व इंटरनेट वापराबाबत आपण सर्वज्ञ आहोत, असा कितीही दावा असला तरी आपण विविध मोबाईल अ‍ॅप्स आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही, याची खात्री असेल तरच माहिती द्यावी.

ठळक मुद्देतज्ज्ञांचा सल्ला : माध्यमांसाठी सायबर जागृती कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मोबाईल व इंटरनेट वापराबाबत आपण सर्वज्ञ आहोत, असा कितीही दावा असला तरी आपण विविध मोबाईल अ‍ॅप्स आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही, याची खात्री असेल तरच माहिती द्यावी. घरातील प्रत्येक व्यवहार आॅनलाईन होत आहे. ही सुविधा आहे. मात्र सुविधा घेताना फायद्यातोट्यांचा विचार करणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सायबर सेलमार्फत आयोजित कार्यशाळेमध्ये दोन तासांच्या विचार मंथनात जनतेला याबाबत जागरुक करण्याचे माध्यमांचे दायित्व त्यांनी पार पाडावे, असे आवाहनही करण्यात आले.महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून ट्रान्सफोर्मिंग महाराष्ट्र अंर्तगत पत्रकार आणि माध्यमांसाठी सायबर जाणीव जागृती उपक्रम महाराष्ट्रभर सुरु आहे. चंद्रपूर जिल्हा सायबर सेल आणि जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांनी सायबर गुन्हे, सायबर विश्व, सायबर हॅकर, सायबर तंत्रज्ञान याविषयी विविध सादरीकरणातून माहिती जाणून घेतली. या विषयाबद्दल आपल्या शंकांचे समाधान करवून घेतले. तसेच सायबर कायद्याच्या उपयुक्ततेविषयी अधिक माहितीही घेतली.कार्यशाळेत सायबर सेलचे पोलीस निरीक्षक के.बी.शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे व मुजावर अली यांनी सायबर गुन्हे कसे घडतात, याची उदाहरणांसह माहिती दिली. ते म्हणाले, इंटरनेट स्वस्त आणि सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आपण उत्साहाच्या भरात आपली वैयक्तिक माहिती कुठे ना कुठे मोबाईलवर अ‍ॅप्स आणि वेबसाईटच्या माध्यमातून टाकत असतो. पण या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो. कुणी कितीही सांगितले तरी ही माहिती पूर्णत: सुरक्षित असतेच असे नव्हे. आता इंटरनेट आॅफ थिंग्सचा जमाना आहे. अनेक घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये इंटरनेटची सोय आहे. याठिकाणीदेखील काही माहिती टाकताना आपण काळजी घेतली पाहिजे.फेसबुकसारख्या मायाजाळात तरुण मुलं एवढेच नव्हेतर सुशिक्षित रोज फसत आहेत. त्यामुळे सावध राहणे हेच यामध्ये महत्वाचे आहे. त्यासाठी नेट वापरणाºया प्रत्येकाला काही मुलभूत बाबींची माहिती माध्यमातून देणे गरजेचे आहे. त्यासाठी पत्रकारांनी आपल्या वृत्तपत्रांमध्ये अशा प्रकारच्या स्तंभांना, लेखांना जागा द्यावी. सोप्या भाषेत याबाबतचे मार्गदर्शन करावे, अशी विनंती यावेळी सायबर सेलच्या अधिकाºयांनी केली.मुजावर अली यांनी चंद्रपूर व परिसरातील सायबर क्राईममधील घटनाक्रमांचे उदाहरण देत आपल्या अवतीभवती सुरु असलेल्या फसवणुकीच्या अनेक घटनाक्रमांना उजागर केले. कार्यशाळेला जिल्हाभरातील विविध माध्यम प्रतिनिधी सहभागी झाले होते.सावधानता बाळगाकाही दिवसांपासून बँकेच्या एटीएममधून फसवणूक करून पैसे काढण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये ग्राहकाने सावधानता बाळगायची आहे. परंतु बँकेचीदेखील सुरक्षेच्या दृष्टीने मोठी जबाबदारी आहे, ग्राहकाची चूक नसेल तर नियमाप्रमाणे विशिष्ट दिवसात त्याला पैसे मिळणे आवश्यक आहे, असेही यावेळी विकास मुंडे यांनी सांगितले.