शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बामणीत अपक्ष तर कोठारीत काँग्रेसची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 00:25 IST

तालुक्यातील बामणी (दुधोली), कोठारी कवडजई, इटोली व काटवली (बामणी) येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल येथील तहसील कार्यालयात मतमोजणी करून मंगळवारी जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक निकाल : कवडजई, इटोली व काटवलीत भाजपाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील बामणी (दुधोली), कोठारी कवडजई, इटोली व काटवली (बामणी) येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल येथील तहसील कार्यालयात मतमोजणी करून मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये बामणी (दुधोली) येथे युवाशक्तीप्रणीत सुभाष ताजणे तर कोठारी येथील ग्रामंपचायतीवर काँग्रेस महाआघाडीचे मोरेश्वर लोहे यांनी विजय मिळविला. तर कवडजई, इटोली व काटवली (बामणी) ग्रामपंचायतीवर भाजपाने घवघवीत यश संपादन केले.बामणी (दुधोली) ग्रामपंचायत सरपंच पदासाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यात युवाशक्ती पॅनलचे सुभाष ताजने एक हजार १७८ मते घेवून सरपंचपदी निवडून आले. येथे भाजपाचे उमेदवार मनोजकुमार माणुसमारे ५६२ मते घेवून दुसºया तर काँग्रेसचे उमेदवार गंगाधर वरारकर २४५ मते घेत चवथ्या स्थानावर राहिले. येथे युवाशक्ती प्रणित सुभाष ताजने पॅनलचे नऊ ग्रामपंचायत सदस्य तर भाजपाला दोन व काँग्रेस व अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिकंली.निवडून येणाºया ग्रामंपचायत सदस्यात प्रभाग एक अ- शेख जमीर, एक ब- वर्षा आलाम, प्रभाग दोन अ- दिलीप काटोले, ब- कमल कोडापे, प्रभाग तीन अ- संतोष टेकाम, ब- सुरेखा मडावी, क- आशा निकोडे, प्रभाग चार अ- श्रीहरी अंचूर, ब - स्वप्नील बोरकर, क- कौशल्या पेंदोर तर प्रभाग पाच अ- चंदू घाटे, ब- सुशील कुळसंगे, क- सुरेखा निब्रड यांचा समावेश आहे.कोठारी येथील ग्रामपंचायत सरपंच काँग्रेसचे मोरेश्वर लोहे यांनी भाजपाचे उमेदवार सुनिल फ रकडे यांचेवर १०८ मताच्या फ रकाने विजय मिळविला.मोरेश्वर लोहे यांना एक हजार ४६६ मते तर सुनिल फ रकडे यांना एक हजार ३५८ मते मिळाली. सरपंच व सदस्य पदासाठी निवडणुकीला सामोरे गेलेले. संजय खाडीलकर, चंद्रकांत राजूरकर व मारोती वांढरे यांना पराभवाचा समाना करावा लागला.या ग्रामपंचायतीत प्रभाग एक अ- राहूल चहारे, ब- स्नेहल टिंबडीया, प्रभाग दोन अ- विलास राजूरकर, ब- विद्या देवाळकर, प्रभाग तीन अ- संजय सिडाम, ब- कल्पना वडघने, क- सायत्राबाई मोहुर्ले, प्रभाग चार अ- युवराज तोडे, ब- शिला वासमवार, क- विना तोरे तर प्रभाग पाच अ- माजी उपसरपंच अमोल कातकर, ब- विमलबाई खोब्रागडे, क- वंदना झाडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. कवडजई येथे सरपंचपदी भाजपाचे शालीकराम पेंद्राम यांनी काँग्रेसचे वामन पेंदोर यांचा पराभव करून निवडून आले. इटोली येथे भाजपाच्या मंगला सातपूते यांनी काँग्रेसच्या मायाबाई पिपरे यांचा पराभव केला. तर काटवली (बामणी) येथे सरपंचपदी भाजपाचे गिरीधर आत्राम यांनी रसिका तोडासे यांचा पराभव केला.