शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची गरिबी हटाओ घोषणा म्हणजे एप्रिल फुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:11 IST

कॉंग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. कॉंग्रेसच्या स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक निवडणुकात गरिबी हटाओचानारा दिला. मात्र गरिबी काही हटली नाही. कॉंग्रेसची ही गरिबी हटाओ घोषणा केवळ एप्रिल फुल असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ गडचांदूर येथील प्रचार सभेत केली.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : गडचांदूर येथे भाजपची प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : कॉंग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. कॉंग्रेसच्या स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक निवडणुकात गरिबी हटाओचानारा दिला. मात्र गरिबी काही हटली नाही. कॉंग्रेसची ही गरिबी हटाओ घोषणा केवळ एप्रिल फुल असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ गडचांदूर येथील प्रचार सभेत केली.यावेळी भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, विधान परिषदेचे आमदार अनिल सोले, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, अशोक जिवतोडे, रिपाइं (आ.) चे सिद्धार्थ पथाडे, डॉ. मंगेश गुलवाडे, न. प. उपाध्यक्ष आनंदी मोरे, नितीन पिपरे, सतिश उपलेंचीवार, नारायण हिवरकर, केशव गिरीमाजी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोदी सरकारच्या कार्यकाळात अनेक नवनवीन योजना राबविण्यात आल्या. विविध योजनेचे गरिबांच्या खात्यावर डिबीटीद्वारे थेट पैसे जाऊ लागले. त्यामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसला. प्रत्येक कुटुंबाला स्वत:चे घर, शौचालये, गॅस आता उपलब्ध होऊ लागले आहे. मुद्रा लोनमुळे बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागला. दळणवळणाचे महत्व लक्षात ठेवून या देशात महामार्गाचे जाळे विणण्याचे एक मोठे काम मोदी यांच्या काळात झाले. त्यामुळे या निवडणुकीत यश मिळणार, असा दावाही त्यांनी केला आहे. सभेला राजुरा कोरपना जिवती क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.पेंडाल उडालामुख्यमंत्र्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. दरम्यान, आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांचे भाषण सुरू असताना अचानक वादळ आले. यात पेंडालचा समोरील भाग उडाला. यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांनी यानंतरच्या भाषणात पेंडाल जसा हव्याने उडाला, तसे कॉंग्रेसला पण हवेत उडवा, असा टोमणा लगावला आणि एकच हशा पिकला.मुख्यमंत्री अडीच तास उशिरामुख्यमंत्र्यांची नियोजित सभा दुपारी १ वाजता होती. परंतु मुख्यमंत्री नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशिरा पोहचल्याने उपस्थितांना भर उन्हात ताटकळत राहावे लागले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019chandrapur-pcचंद्रपूर