शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

सावलीत काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:18 IST

केंद्र व राज्य शासनाने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. तर अच्छे दिनचे आमिष दाखवून संपूर्ण भारतीयांची फसवणूक केल्याचा आरोप करीत सावलीच्या तहसील कार्यालयावर

ठळक मुद्देशेतकºयांचा उत्स्फूर्त सहभाग : तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : केंद्र व राज्य शासनाने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. तर अच्छे दिनचे आमिष दाखवून संपूर्ण भारतीयांची फसवणूक केल्याचा आरोप करीत सावलीच्या तहसील कार्यालयावर काँग्रेसने धडक मोर्चा काढून शासनाचा निषेध नोंदविला.सावली-ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात तालुक्यातील संतप्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नोटबंदी, पेट्रोल, डिझेलची भाववाढ, सिलिंडरची भाववाढ, घरगुती उपयोगांच्या वस्तुंची भाववाढ, जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ करून सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजुरांचे कंबरडे मोडणाºया केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. अच्छे दिन येणार असे आश्वासन देऊन प्रत्येकी पंधरा लाख रुपये खात्यात जमा होणार, काळा पैसा भारतात परत आणणार, अशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भुलथापेला बळी पडलेल्या शेतकºयांनी मोदींची प्रेतयात्रा काढून शासनाच्या निर्णयाप्रति आपला रोष व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, विनायक बांगडे, विनोद दत्तात्रय, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, नंदू नागरकर, प्रकाश पाटील मारकवार, दिनेश चिटनूरवार, नंदा अल्लुरवार, उषा भोयर, सावलीच्या नगराध्यक्ष रजनी भडके, उपाध्यक्ष विलास यासलवार, जि.प. सदस्य वैशाली शेरकी, भास्कर गड्डमवार, मनोहर गेडाम, संदीप पुण्यपवार, राकेश गड्डमवार आदी उपस्थित होते.सावली नगरपंचायत समोरच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सावली तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजू सिद्धम यांनी केले तर आभार पं.स. सदस्य विजय कोरेवार यांनी मानले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन सावलीच्या तहसीलदारांमार्फत शासनाला पाठविण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.