शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर

By admin | Updated: August 2, 2016 01:41 IST

बल्लारपृर बायपासलगत असलेल्या पागलबाबा नगराजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालासाठी असलेली

दिवसभराचे धरणे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा न बदलल्यास आंदोलनाचा इशारा चंद्रपूर : बल्लारपृर बायपासलगत असलेल्या पागलबाबा नगराजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालासाठी असलेली प्रस्तावित जागा सर्व दृष्टीने अयोग्य आहे. ही जागा बदलून सोईच्या जागेवर हे महाविद्यालय उभारले जावे, या मागणीसाठी सोमवारी जिल्हा एनएसयुआय आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर धरणे दिले. या जागेचा फेरविचार झाला नाही तर, भविष्यात आंदोलन उभाऱ्याचा इशाराही यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आला. चंद्रपूर जिल्हा एनएसयुआयने १ आॅगस्टला स्थानिक गांधीचौकात धरणा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी सकााळी ११ वाजतापासून या धरण्याला प्रारंभ झाला. एनएसयुआयच्या आवाहनावरून पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही यात सहभाग घेतला. भर पावसातही या मागणीसाठी नागरिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटले होते. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून या संदर्भातील एक निवेदन सादर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या मागणीसाठी निवदेन पाठवून आपल्या भावना कळविण्यात आल्या. पागलबाबा नगरजवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्तावित केलेली जागा सर्व दृष्टीने गैरसोईची असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या जागेलगतच महानगर पालिकेचा डंपिग यार्ड असल्याने आणि काही अंतरावर एमईएल प्रकल्प असल्याने या परिसरात मोठ्या प्रमावर प्रदुषण आणि दुर्गंधी असते. त्यामुळे ही जागा रूग्णांच्या दृष्टीने कशी योग्य ठरू शकते, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नागरिकांच्या आरोग्याचा तर विचार करा - पुगलिया या संदर्भात धरणास्थळी दुपारी माजी खासदार नरेश पुगलिया यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, वाहतूक, दळणवळण, स्वच्छता, प्रदुषण या सर्व दृष्टीने पागलनगर परिसरातील जागा अयोग्य आहे. तरीही या जागेसाठी सरकारचा हेका कशासाठी आहे, हे समजायला मार्ग नाही. निदान नागरिकांच्या आरोग्यचा आणि गैरसोईचा विचार करून तर जागा ठरवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नरेश पुगलिया म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अन्य जागा निश्चित करण्याची गरज आहे. ही जागा उंचसखल असल्याने ती समतल करण्यासाठी ६५ कोटी रूपयांचा अनाठायी खर्च होणार आहे. प्रदुषण आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य येथे धोक्यात आहेच, सोबतच, जवळच जुनोना जंगल असल्याने वन्यप्राण्यांचा वावर या परिसरात असतो. त्यामुळे रात्री येणाऱ्या रूग्णांच्या दृष्टीने पूर्णत: गैरसोईचे आहे. ही जागा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. प्रस्तावित जागेचे भौगोलिक क्षेत्रही चांगले नाही. रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकापासून हे अंतर अधिक असल्याने ग्रामीण नागरिकांची गैरसोयच होणार आहे. यामुळे सरकारने या बाबींचा गंभीरपणे विचार करायला हवा, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला कव्वाल मसीज शोला, गजानन गावंडे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल तिवारी, प्रदेश उपाध्यक्ष रोशनलाल बिट्टू, जिल्हा उपाध्यक्ष काशिफ अली, दुर्गेश चौबे, नगरसेवक प्रवीण पडवेकर, अशोक नागापुरे, प्रशांत दानव माजी नगराध्यक्ष डॉ.सुरेश महाकुलकर यांच्यासह नगरसेवक, तसेच काँंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.