शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

आर्णीमध्ये काँग्रेस करणार ‘चाय की चर्चा’

By admin | Updated: June 12, 2016 00:41 IST

यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी (तालुका आर्णी) येथे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी....

१६ जूनला आयोजन : मोदींना घेरण्याची तयारीचंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी (तालुका आर्णी) येथे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (चाय पे चर्चा) हा कार्यक्रम करून शेतकऱ्यांच्या समस्या आणि उन्नतीवर चर्चा घडवून आणली होती. मात्र दोन वर्षात शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या दृष्टीने कसलीही आखणी झाली नाही, उलट आत्महत्या वाढल्या. त्यामुळे पंतप्रधानांच्या आश्वासनांवर उत्तर म्हणून काँग्रेसने ‘चाय की चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.१६ जूनला आर्णी येथील बालाजी जिनींगच्या सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होऊ घातला असून त्यातून पंतप्रधानांना त्यांनी दोन वर्षांपूर्वी तेथील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली जाणर असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेतून दिली. शिवाजीराव मोघे म्हणाले, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभाडी येथे ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम ठेवला होता. शेतकऱ्यांना दिलेल्या वारेमाप आश्वासनांची भरपूर प्रसिद्धी करून त्यांनी सत्ता मिळविली. ते पंतप्रधानही झाले. मात्र त्याच गावातील सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या त्यांना थांबविता आल्या नाहीत. यावरून त्यांच्या आश्वासनातील फोलपणा स्पष्ट होतो. सत्तेत येताच शेतकऱ्यांना ते उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा देणार होते. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. कापसाचा दर फक्त ५० रूपयांनी वाढविण्यात आला. शेतकऱ्यांना अल्पदरात कर्ज देण्याचीही घोषणा होती. मात्र शेतकरी आजही कर्जासाठी बँकाच्या दारात दिसत आहे. स्व.राजीव गांधी यांच्या नावाने असलेल्या जीवनदायी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. निवडणुकीसाठी शेकडो सभा घेवून विदर्भवारी करणारे पंतप्रधान आज विदर्भात आणि देशात दुष्काळ असताना एकदाही फिरकलेले नाहीत. यावरून त्यांचा जनतेप्रति असलेला कळवळा दिसतो, अशीही टीका त्यांनी केली. सर्व आघाड्यांवर आलेले अपयश आणि आश्वासनातील खोटारडेपणा जनतेसमोर आणण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, राज्यसभा सदस्य राज बब्बर, राष्ट्रीय युवक कांग्रेस अध्यक्ष अमरींद्र सिग राजा ब्रार व प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कदम उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी खासदार नरेश पुगलिया, पांढरकवडाचे नगराध्यक्ष शंकर बढे, यवतमाळ काँग्रेसचे जिल्हा सरचिटणिस भरत राठोड, राहुल पुगलिया, गजानन गावंडे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)