शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

११० ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: August 10, 2015 00:41 IST

जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी या तालुक्यातील जवळपास १६१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री ....

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र : विजय वडेट्टीवार यांच्या गटाने केला दावाचंद्रपूर : जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी या तालुक्यातील जवळपास १६१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे केले होते. यात १६१ ग्रामपंचायतीपैकी काँग्रेसने ११० ग्रामपंचायतींमध्ये निर्विवाद बहुमत मिळविले असल्याचा दावा गटाने केला आहे.ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र पूर्वी भाजपाचा बालेकिल्ला होता. त्यामुळे ३५ वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात विजय संपादन केले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना सुरूवात होताच, या तिन्ही तालुक्यामध्ये आमदार वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे केले. त्यात सावली तालुक्यातील ४८ पैकी ३५ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यात चारगाव ९ पैकी ६, चांदली ९ पैकी ७, खेडी ९ पैकी ५, चकपिरंजी ९ पैकी ५,व्याहाड खुर्द ११ पैकी ११, व्याहाड बुज. ११ पैकी ७ , सामदा ११ पैकी ८, उपरी ९ पैकी ६, मुंडाळा ९ पैकी ७ काँग्रेस, पाथरी ११ पैकी ८, सायखेडा ९ पैकी ६, केरोडा ९ पैकी ५, अंतरगाव ९ पैकी ६, विहिरगाव ७ पैकी ४, निमगाव ११ पैकी ७, चिचबोडी ९ पैकी ५, चंकबिरखल ९ पैकी ९ काँग्रेस-राकाँ, बोरमाळा ७ पैकी ५, मेहा ७ पैकी ५, पालेबारसा ७ पैकी ५, मंगरमेंढा ७ पैकी ४, चिखली ७ पैकी ४, करोली ७ पैकी ५ काँग्रेस-राकाँ, आकापूर ७ पैकी ५ काँग्रेस-राकाँ, बेलगाव ७ पैकी ४, साखरी ९ पैकी ९, जिबगाव ७ पैकी ७, लोंढोली ९ पैकी ७, हरंबा ९ पैकी ७, निलरानी पेठगाव ९ पैकी ५, वाघोली ७ पैकी ४, कोंडेखल जाम ७ पैकी ५, तर कढोली आणि पारडी या गावात काँग्रेसचे उमेदवार अविरोध निवडून आले आहे. अंतगाव उसरपार चक, डोंगरगाव, निफंद्रा, घोडेवाही, पेंढरी, हिरापूर, सोनापूर, कापसी या ग्रामपंचायतीमध्ये राकाँ तर कवठी, करगाव, थेरगाव, डोनाळा या चार ग्रामपंचायतीमध्ये भाजपा विजयी झाले आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील ५७ पैकी ४६ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने विजयी संपादन केले असून त्यात किन्ही ९ पैकी ५, चकबोथली ७ पैकी ७, बल्लारपूर, सुरबोडी, खरकाडा अविरोध, एकारा ९ पैकी ७, भुज ९ पैकी ९, रामपुरी ९ पैकी ६, जवराबोढा मेढा ९ पैकी ५, गोगाव ९ पैकी ७, सावलगाव ७ पैकी ५, तळोधी खुर्द अविरोध, अहेर नवरगाव १३ पैकी ८ काँग्रेस-राकाँ, रणमोचन ७ पैकी ५ भालेश्वर ७ पैकी ५, मुई ७ पैकी ५ कोसंबी खेड ७ पैकी ५, मुडझा ११ पैकी ७, हळदा ११ पैकी ७, निलज ९ पैकी ५, पाचगाव ७ पैकी ४, बरडकिन्ही ९ पैकी ७, चिचगाव ७ पैकी ५, वायगाव ९ पैकी ९, तुलानमेंढा ९ पैकी ६, बांद्रा ९ पैकी ६, आक्सापूर ७ पैकी ५, रूद्रापूर, मालडोंगरी, चांदगाव, पारडगाव, बेंटाळा, बोंढेगाव, कन्हाळगाव, तोरगाव, तोरगाव खुर्द, बेलगाव जाणी, कालेता, सोदरी, कोथुरणा मक्ता, झिलबोडी, सायगाव या ४६ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस तर खंडाळा, कोलारी, चांदली, चिचोली भुज, हरदोली, जुगनाळा, बोरगाव, चिखलगाव, दिघोरी, रानबोगीली, सोनेगाव आदी ग्रामपंचायतीत काँग्रेसने बाजी मारली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)सिंदेवाही तालुक्यातही आघाडीसिंदेवाही तालुक्यातील ४३ पैकी २९ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने बाजी मारली. यात सरडपार, पेठगाव, डोंगरगाव, चारगाव, कुकूडहेटी, रत्नापूर, मोहाळी, रामाळा, गडमौशी, मिनझरी, अंतरगाव, चिकमारा, विरव्हा, टेकरी, किन्ही, वानेरी, गुंजेवाही, वाकल, लोणखैरी आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.