शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

चंद्रपूर बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: April 19, 2016 05:15 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर

चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. यात काँग्रेस पक्षाने १३ जागा जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. भाजपाला मात्र केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. तर १ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून दिनेश चोखारे २४९, गंगाधर वैद्य २४१, विजय बल्की २३८, गोविंदा कुडे २३४, चंद्रकांत गुरू २३०, विजय टोेंगे २२९ व योगेश बोबडे हे २१० मते घेऊन विजयी झाले. तर महिला गटातून अल्का वाढई २४५, शोभा वरारकर २४० मते घेऊन विजयी झाले. इतर मागासवर्गीय गटातून निरज बोढे २५१, सहकारी संस्था (विमुक्त जाती, भटक्या जमाती, विमाप्र) शिला मेकलवार या १८९ मते घेऊन विजयी झाले. हे सर्व उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहेत. ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून भाजपाचे उत्तम आंबळे २५६, सुनील फरकाडे हे २४२ मते घेऊन विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसुचित जाती,जमाती गटातून शोभा ठाकरे २६८, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून नामदेव जुनघरे २०७ तर व्यापारी गटातून भाजपाचे अरविंद चवरे २६३ व संतोष चिल्लावार १९५ मते घेऊन विजयी झाले. हमाल, मापारी गटातून अपक्ष उमेदवार प्रभाकर सिडाम हे ३१ मते घेऊन विजयी ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील नवघडे यांनी काम पाहिले. दोन कोटींवर उलाढाल असलेल्या बाजार समितीवर यापूर्वी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. (स्थानिक प्रतिनिधी)मतमोजणी दरम्यान गोंधळ४ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून भाजपाचे सुनील फरकाडे यांनी गोविंद उपरे यांचा २ मताने पराभव करीत २४२ मते घेऊन विजयी झाले. तेव्हा गोविंद उपरे यांनी आक्षेप नोंदवून परत मतमोजणीची मागणी केली. या दरम्यान मतमोजणी सभागृहात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून उपस्थित कार्यकर्त्यांना बाहेर काढून परत मतमोजणी करण्यात आली. यात सुनील फरकाडे हे २ मताने विजयी झाले. तर हमाली, मापारी गटातून प्रभाकर सिडाम यांनी मारोती सिडाम यांचा केवळ १ मताने पराभव केला.