शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

चिमूरच्या संस्थेवर काँग्रेस प्रणित पॅनलचा झेंडा

By admin | Updated: April 23, 2015 01:07 IST

चंद्रपूर जिल्ह्यात नामांकीत असलेली चिमूर विविध कार्यकारी संस्थेच्या पंचवार्षीक निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलचा विजय झाला.

चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यात नामांकीत असलेली चिमूर विविध कार्यकारी संस्थेच्या पंचवार्षीक निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलचा विजय झाला. आमदार भांगडिया यांच्या शेतकरी परिवर्तन सहकार पॅनलचा काँग्रेस प्रणित पॅनलने सफाया केला.चिमूर विविध कार्यकारी संस्थेवर आजपर्यंत काँग्रेस प्रणित पॅनलचीच सत्ता राहिली आहे. यावेळी अनेक गट या निवडणुकीत उतरले. आमदार कीर्ती भांगडिया यांनी शेतकरी परिवर्तन पॅनल लढविले तर काँग्रेस प्रणित पॅनलचे माधव बिरजे यांनी १३ उमेदवार रिंगणात उतरवीत १२ जागेवर विजय संपादन केला. आमदार भांगडिया यांच्या पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. यात अ‍ॅड. नवयुक कामडी हे विजयी झाले. तर काँग्रेस प्रणित पॅनलमध्ये माधव बिरजे, राजू लोणारे, बाळकृष्ण बोभाटे, जगदिश लाखे, विकास शिंदे, प्रकाश बोकारे, सुरेश हिंगे, विकास नवले, देविदास मोहीनकर, गोपाल सावरकर, लिला कामडी, रेखा धानोरकर विजयी झाले.या निवडणुकीत तिसऱ्या गटाने जागा लढविल्या. परंतु, त्यांना खाताही उघडता आले नाही. निवडणुकीचे निकाल काँग्रेस प्रणित पॅनलकडे लागत असताना फटाक्याची आतिषबाजी करून शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जिल्हा परिषदेचे गटनेते सतिश वारजूकर, संजय डोंगरे, संजय कुंभारे, सुधीर पंडीलवार, राजू हिंगणकर, भीमराव ठावरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. अगडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. (तालुका प्रतिनिधी)