शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकारिणीवर नाराज गटाची प्रदेशाध्यक्षांकडे धाव

By admin | Updated: June 8, 2016 00:49 IST

आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढकारात घोषित झालेली जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी गटबाजीला प्रोत्साहन देणारी असून ...

हे तर गटबाजीला प्रोत्साहन : पुगलिया गटाने पाठविले पत्रचंद्रपूर : आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढकारात घोषित झालेली जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी गटबाजीला प्रोत्साहन देणारी असून पक्षकार्यकर्त्यांवर अन्याय करणारी असल्याचे सांगत पुगलिया गटाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रकाराचा गंभीरपणे विचार करून प्रदेश कार्यकारिणीची सभा बोलवावी आणि पक्ष मजबूत होण्याच्या दृष्टीने विचार व्हावा, अशी मागणी पत्रातून केली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा काँग्रेसची जंबो कार्यकारिणी घोषित झाली. यात अनेकांना डावलल्याची प्रतिक्रिया उमटली होती. यावरून धुसफुस सुरू होती. त्याची परिणती प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठविण्यात आणि पत्रकार परिषदेतून नाराजी प्रगट करण्यात झाली. जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव अ‍ॅड. अविनाश ठावरी, काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष गटनेते सतीश वारजुकर, माजी महापौर सुरेश महाकुलकर, सुनिता लोढीया यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष विजय देवतळे यांच्यावर आरोप करण्यात आले. ते म्हणाले, मागील निवडणुकीत तत्कालिन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभारी मोहन प्रकाश यांच्या आशिर्वादामुळे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांनी एकतर्फी राजकारण चालविले होते. त्याचा परिणाम पक्षावर झाला. ही बाब लक्षात आणूनही पक्षातील नेत्यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्या निष्क्रियतेपणामुळे पक्षाची पिछेहाट झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सुचनेवरून आपण पक्ष बळकट करण्याचे काम सातत्याने केले. असे असतानाही पक्ष बदलणाऱ्या धनाढ्य उमेदवाराला संधी मिळाली. मात्र त्यांनी मिवालेल्या सत्तेचा दुरूपयोग पक्षात गटबाजी पसरविण्यासाठी केला. त्याची दखल घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आपल्या मागणीची आणि पत्राची दखल प्रदेशाध्यक्ष घेतील, असा विश्वास यावेळी उपस्थित काँग्रेसजनांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)