शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर सहकारी तांदूळ गिरणी निवडणुकीत काँग्रेस गटाचे वर्चस्व

By admin | Updated: August 24, 2015 01:18 IST

चिमूर सहकारी भात गिरणी समिती चिमूरची निवडणूक गुरूवारी जिल्हा परिषद कन्या हायस्कूलमध्ये पार पडली.

चिमूर : चिमूर सहकारी भात गिरणी समिती चिमूरची निवडणूक गुरूवारी जिल्हा परिषद कन्या हायस्कूलमध्ये पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाने सात जागा जिंकून वर्चस्व प्राप्त केले व भाजपा समर्थित गटाला पुन्हा सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले.चिमूर सहकारी भात गिरणी समितीमध्ये १३ संचालक पाच वर्षे कालावधीसाठी निवडले जातात. यात पिंपळनेरी गटातून संदीप शिरभैय्ये हे अविरोध निवडून आल्याने काँग्रेस गटात अगोदरच एका संचालकाची भर पडल होती. असे असले तरी या निवडणुकीत दोन्ही गटाने वर्चस्वाच्या लढाईत साम-दाम-दंड वापरून निवडणूक चुरशीची केली. विशेष म्हणजे काँग्रेस गटाकडून प्रा.दादा दहिकर तर भाजपा गटाकडून प्रवीण गणोरकर हे जवळचे नातलग एकमेकांच्या विरोधात होते. प्रा.दादा दहिकर यांनी दोन मते जास्त घेवून गणोरकर यांचा पराभव केला. भाजपा गटात सहकारी भात गिरणीच्या संस्थापकापासूनच्या कुटुंबातील योगेश ऊर्फ श्रीकांत नाकाडे व विद्या नाकाडे हे मायलेक विजयी झाले.काँग्रेस गटात संदीप शिरभैय्ये, डॉ. संजय बोढे, नथ्थू तळवेकर, शामराव घरत, पांडुरंग पचारे, रसीका नाकाडे, प्रा.दादा दहीकर हे सात संचालक निवडून आल्याने वर्चस्व प्राप्त केले तर भाजपा गटातून विद्या नाकाडे, श्रीकांत नाकाडे, मधुकर नन्नावरे, डॉ.श्याम हटवादे, मधुकर भलमे, अशोक पोटदुखे हे सहा संचालक निवडून आले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रस्सीखेच आहे. निवडून आलेले संचालक एकत्रीत राहतील काय? याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस गटाकडून सहकार युवा नेते संजय कुंभारे, संजय डोंगरे यांनी नेतृत्व केले तर भाजपाकडून डॉ.श्याम हटवादे, विलास नाकाडे यांनी नेतृत्व केले. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक राजू अगडे, चव्हाण यांनी काम पाहिले तर पी.एस.आय. नैताम यांच्यासह त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.चिमूर सहकारी भात गिरणीमध्ये आमदार विजय वडेट्टीवार, आमदार मितेश भांगडिया हेदेखील मतदार होते. परंतु त्यांनी मतदानाचा हक्क बजाविला नाही. एक किंवा दोन मताने पराभूत झालेले उमेदवार या दोन नेत्यांच्या गैरहजेरीने हळहळ व्यक्त करीत होते. (तालुका प्रतिनिधी)