शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने देशाला मुर्ख बनविण्याचे काम केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:23 IST

काँग्रेसने या देशाला ५०-६० वर्ष एप्रिल फुल बनविण्याचे काम केले. काँग्रेसकडून ते काम आताही सुरूच आहे. पंडित नेहरूंपासून देण्यात येणारा ‘गरिबी हटाव’चा नारा काँग्रेसकडून आजही देणे सुरूच आहे. पण देशातील गरिबी हटली नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागभीड येथे केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री : नागभीड येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : काँग्रेसने या देशाला ५०-६० वर्ष एप्रिल फुल बनविण्याचे काम केले. काँग्रेसकडून ते काम आताही सुरूच आहे. पंडित नेहरूंपासून देण्यात येणारा ‘गरिबी हटाव’चा नारा काँग्रेसकडून आजही देणे सुरूच आहे. पण देशातील गरिबी हटली नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागभीड येथे केले.ते नागभीड येथे आयोजित करण्यात आलेल्या गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, गडचिरोली - चिमूर लोकसभेचे उमेदवार अशोक नेते, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार मितेशकुमार भांगडिया, जि.प.उपाध्यक्ष कृष्णा सहारे, जिल्हा भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मते, नागभीडचे नगराध्यक्ष उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृ.उ.बा.स.सभापती आवेश पठाण, वसंत वारजूकर, न.प.चे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, चिमूर - नागभीडचे भाजप - शिवसेना तालुका अध्यक्ष यांचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मोदी सरकारने गरिबांचे हित लक्षात घेऊन अनेक योजना राबविल्या. विविध योजनांचे गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जाऊ लागले आहेत. ९८ टक्के कुटुंबाकडे आता शौचालये झाली आहेत. पाच कोटी कुटुंबांना गॅस दिले आहेत. मुद्रा लोनद्वारे अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.गरिबांना घरे देण्याचे काम मोदी सरकारने केले. दळणवळणाचे महत्त्व लक्षात घेऊन या देशात महामार्गांचे जाळे विणण्याचे एक मोठे काम मोदी सरकारच्या काळात झाले, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार अशोक नेते, आ.कीर्तीकुमार भांगडिया यांनीही मनोगत व्यक्त केले.