शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

देशाला दिशा देण्याची क्षमता काँग्रेस पक्षातच

By admin | Updated: August 9, 2016 00:47 IST

देशात सध्याचे भाजप सरकार केवळ खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम प्रसारमाध्यमांना हाताशी ...

 सुभाष धोटे : कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळेच निवडणुकीत पक्षाला यशराजुरा : देशात सध्याचे भाजप सरकार केवळ खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम प्रसारमाध्यमांना हाताशी धरून मोठ्या जोरकसमध्ये करीत आहे. विकासाची मोठमोठी आकडे केवळ फुगवून सांगण्याचे काम करीत आहे. मात्र देशाला दिशा देण्याची खरी क्षमता केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षातच आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा जेष्ठ नेते बाबुराव तिडके यांनी केले. शनिवारी राजुरा येथील एका सभागृहात पार पडलेल्या राजुरा विधानसभा क्षेत्रातील नगर पंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे सरचिटणीस माजी आ. सुभाष धोटे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश पुढेही कायम रहावे यासाठी कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे. पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते माजी आ. प्रभाकर मामुलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव सुभाष धोटे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जिल्हा अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, विनोद दत्तात्रय, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, युवक काँग्रेस लोकसभा अध्यक्ष शिवाराव पोलशेट्टी, तालुकाध्यक्ष दादा पा. लांडे, विठ्ठलराव थिपे, राजीवसिंह चंदेल, सुरेखा चिडे, क्रांती नालमवार, सत्यनारायण अग्रवाल, पंचायत समिती सभापती निर्मला कुळमेथे, रत्नमाला तोरे, उपसभापती रामचंद्र कुरवटकर, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, नानाजी आदे, अविनाश जाधव, जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, दिलीप नलगे, राजुराच्या नगराध्यक्ष मंगला आत्राम, कोरपनाच्या नगराध्यक्षा नंदा बावणे, उपनगराध्यक्ष अरुण धोटे, गटनेता स्वामी येरोलवार, पापया पोनमवार, सुनिल देशपांडे, पंचायत समिती सदस्य अब्दुल जमीर, भीमया अंगलवार, हर्षा चांदेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन फुलझेले यांनी केले. प्रास्ताविक दादा पा. लांडे यांनी तर आभार आशिष देरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेस युवक काँग्रेसचे पदाधिकारी, महिलांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)