शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरोधात काँग्रेसची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:04 IST

महागाई कमी करून इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, या आशेवर जनतेने मोदी सरकारला निवडून दिले.

ठळक मुद्देमतदारात जागर : फूल देऊन केला भाजपा सरकारचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महागाई कमी करून इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, या आशेवर जनतेने मोदी सरकारला निवडून दिले. मात्र याच सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर वस्तूंचे दर वाढवून सर्वसामान्यांना बेजार केले आहे. या अन्यायाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने जिल्हाभरात गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात गांधी चौक व जटपुरा गेटवर नागरिकांना गुलाबाचे फूल देऊन मतदारांना जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.आज सोमवारी सकाळी ११ वाजता येथील गांधी चौकात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित आले. त्यानंतर या मार्गावरून जाणाºया प्रत्येक नागरिकास सरकारचा निषेध करणारे पत्रक गुलाबाचे फूल देऊन वाढती महागाईचा विरोध करण्यात आला. यावेळी भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजीही करण्यात येत होती. त्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणा देत जटपुरा गेटवर पोहचले. तिथेही नागरिकांना गुलाबाबे फूल देत भाजपाने ‘अच्छे दिन’च्या नावावर कशी फसवणूक केली, याबाबत सांगण्यात येत होते. आंदोलनात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गजानन गावंडे, राहुल पुगलिया, डॉ. सुरेश महाकूळकर, कुशल पुगलिया, अविनाश ठावरे, अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, सकिना अन्सारी, विना खनके, प्रविण पडवेकर, नासीर खान, भास्कर माकोडे, मेघा भाले, वसंत मांढरे, रामदार वाग्दरकर, किष्णन नायर, चंद्रशेखर पोडे व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.ही नागरिकांची फसवणूक - नरेश पुगलियामोदी सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावावर देशातील नागरिकांची फसवणूक केली आहे. महागाई एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे की सर्वसामान्य जनतेला जीवन जगणेच कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर भरमसाठ वाढवून जनतेची घोर निराशा केली आहे. अशा सरकारचा आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करीत आहोत, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.