शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिवती तहसील कार्यालयावर धडकला काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: October 26, 2016 00:56 IST

सरकारने जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील शेतकऱ्यांच्या जमिनी वनजमीन म्हणून घोषित केल्याच्या ...

जिवती : सरकारने जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील शेतकऱ्यांच्या जमिनी वनजमीन म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी मंगळवारी माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमेटीचे सरचिटणीस सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात हजारो कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा जिवती तहसील कार्यालयावर धडकला.यावेळी तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष गोदरु पाटील जुमनाके, राजुरा विधानसभा युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर, माजी जि.प. सदस्य भीमराव पाटील मडावी, पंचायत समितीचे उपसभापती सुग्रीव गोतावळे, नगराध्यक्ष गजानन जुमनाके, माजी पंचायत समिती सभापती दत्तात्रेय माने, विधानसभा युवक कॉंग्रेसचे महासचिव अश्पाक शेख, निशीकांत सोनकांबळे, ममता जाधव, गणपत आडे, भीमराव मेश्राम आदी नेते उपस्थित होते. जिवती तालुक्यातील संपूर्ण माणिकगड पहाड सरकारने वनजमीन घोषित करून अतिक्रमण हटविण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे अख्या जिवती तालुक्यातील लोकांच्या उदरनिर्वाह व निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने सदर कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.तसेच अतिक्रमीत आणि शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांना त्वरित शेतजमिनीचे पट्टे देण्यात यावे, प्रचलित महाराष्ट्र व तेलंगाना सीमेवर असलेल्या १४ गावातील जमिनीचे अभिलेख तयार करून शेतकऱ्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे, जिवती येथील मंजूर ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम त्वरित सुरु करण्यात यावे, जिवती, कोदेपूर व गुडशेला येथील बंद केलेले तलावाचे काम त्वरित सुरु करण्यात यावे, तलावात गेलेल्या शेतजमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा, ज्या आदिवासींना शेतजमिनीचे पट्टे मिळाले आहे, अशा शेतकऱ्यांना सातबारा देण्यात यावा, जातीच्या दाखल्याबाबतच्या जाचक अटी दूर करण्यात याव्या, युपीए सरकारच्या काळात तेंदूपत्ता मजुरांना बोनस मिळत होते, ते पूर्ववत सुरु करण्यात यावे, तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, त्वरित रस्ते दुरुस्त करण्यात यावे, २००५-०६ च्या वनहक्क कायद्यानुसार वनहक्क पट्टे इतर पारंपारिक वनशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)राज्य शासन असंवेदनशील -सुभाष धोटेमाणिकगड पहाडावरील वनजमिन घोषित करून वास्तव्य व कास्त करीत असलेल्या हजारो लोकांना न्यायालयाच्या आदेशामुळे बेघर व भुमीहीन होण्याची वेळ आली आहे. लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असते. मात्र जिल्ह्यात आमदार, खासदार, वनमंत्री व केंद्रीय मंत्री असताना शासन न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात न गेल्याचे आश्चर्य वाटते. राज्य शासन असंवेदनशील असल्याचा आरोप माजी आमदार तथा प्रदेश कॉँग्रेस कमेटीचे सरचिटणीस सुभाष धोटे यांनी यावेळी केला आहे.