शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटेंसह इतरांवर अ‍ॅट्रासिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 05:00 IST

राजुरा लैंगिक अत्याचार प्रकरण; असंवेदनशील वक्तव्य अंगलट

चंद्रपूर : राजुरा येथील एका खासगी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन आदीवासी मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी केलेले असंवेदनशील वक्तव्य जिल्ह्यातील तीन बड्या काँग्रेस नेत्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. येथील रामनगर पोलीस ठाण्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह इतरांवर बुधवारी रात्री अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. अत्याचाराची घटना घडलेले वसतिगृह ज्या संस्थेचे आहे त्याचे अध्यक्षही धोटेच आहेत.अत्याचाराची घटना १३ एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकरणात न्यायालयाने दोन महिलांसह पाच जणांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजुरा येथे संतप्त आदिवासी बांधवांनी काढलेल्या मोर्चातील जनभावना लक्षात घेता दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्हा न्यायाधीश अंसारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एसआयटी गठित केली आहे.तीन वेगवेगळ्या यंत्रणा तपास करीत असताना काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे व लोकसभेचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुलींचे पालक शासकीय मदतीसाठी तक्रारी करीत असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे संपूर्ण विदर्भात संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर वडेट्टीवार यांनी मंगळवारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी व्यक्त केली. तसेच सुभाष धोटे यांनीही प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर माफी मागितली.दरम्यान, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात आदिवासी संघटनांनी तक्रारी सादर करून या तीनही नेत्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष कमलेश आत्राम यांच्या तक्रारीवरून सुभाष धोटे यांच्यासह इतरांविरुद्ध कलम ३, १ (आर) अनुसूचित जाती-जमाती सुधारित अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सीआयडी चौकशी करण्याची मागणीराज्य महिला आयोगानेही आ. वडेट्टीवार, धोटे व धानोरकर यांना असंवेदनशील वक्तव्याबद्दल नोटीस बजावली असून ३० एप्रिलपर्यंत स्वत: उपस्थित राहून खुलासा करण्याचे निर्देशही दिले आहेत. या लैंगिक अत्याचार प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी मर्दानी महिला आस्था मंचच्या अध्यक्ष माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केली.