शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरपना येथे पार पडली कॉंग्रेसची सहविचार सभा

By admin | Updated: October 24, 2015 00:41 IST

राज्यात कॉंग्रेसचे शासन असतानाच पृथ्वीराज चव्हाण सरकारने राज्यातील तालुकास्तरावर नगर पंचायत स्थापन करण्याची घोषणा केली होती.

गडचांदूर : राज्यात कॉंग्रेसचे शासन असतानाच पृथ्वीराज चव्हाण सरकारने राज्यातील तालुकास्तरावर नगर पंचायत स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यादृष्टीने युती सरकारने ते अंमलात आणले असून सदर निवडणुकीच्या तयारीसाठी कोरपना येथे मंगळवारी कॉंग्रेसची सहविचार सभा पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुभाष धोटे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीधरराव गोडे, जि.प. सदस्य उत्तम पेचे, जि.म.स. बँकेचे संचालक विजय बावणे, पाशा पटेल, राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर, श्याम रणदिवे, सुनिल बावणे व इतर मान्यवर उपस्थीत होते.अध्यक्षीय भाषणातून सुभाष धोटे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. राजुरा विधानसभा क्षेत्रात कोणत्याही महत्त्वपूर्ण कामाला सुरवात झाली नाही. रस्त्यांची तर अतिशय दुर्दशा झाली आहे. मोदी व फडणवीस सरकारने केवळ निवडणुका जिंकण्यासाठी जनतेला आश्वासने दिली होती. त्यावेळी सर्व मतदार खोट्या आश्वासनाला बळी पडले. मात्र आता जनता जागृत झाली आहे. सरकारचे अपयश लोकांना दिसू लागले आहे. शेती उत्पादनाला भाव नाही, महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकांच्या प्रश्नांना सरकारकडून उत्तरे मिळत नाही अशा शब्दात भाजपवर टीका करून खरपुच समाचार घेतला. कार्यकर्त्यांच्या भरवशावर कोरपना नगर पंचायतीची निवडणूक लढायची आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजुटीने व जिद्दीने निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले. संचालन विजय बावणे यांनी केले. यावेळी कोरपना येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भारत निरंजने व बहुजन समाज पक्षाचे भीमरतन भगत यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. (शहर प्रतिनिधी)