लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीची बैठक सोमवारी पार पाडली. या सभेत पक्षाच्या पुढील वाटचालीूबाबत चर्चा करण्यात आली. येत्या १८ जून रोजीइफ्तार पार्टीचे आयोजन करण्याचेही ठरविण्यात आले. इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ७ ते २० आॅगस्टपर्यंत पक्ष संघटना निवडणूका संदर्भात बुथ कमिटीच्या नियुक्त करण्याबाबत विचार विनियम झाला. मनपा सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या विजय व पराभूत उमेदवारासोबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली. आगामी लोकसभा व विधानसभाचे निवडणूुीचे लक्ष समोर ठेवून केलेल्या बुथ कमिटीच्या माध्यमातून प्रभागात जावून संघटना बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव आसावरी देवतळे, संतोष लहामगे, अनिल शिंदे, अनिल सुरपम, अॅड. मलिक शाकीर, विनोद संकत, फारुक सिद्दकी, गोपाल अमृतकर माजी नगरसेवक, दुर्गेश कोडाम माजी नगरसेवक, सुलेमान अली, शालिनी भगत, प्रियंका श्याम वानखेडे, निलेश खोब्रागडे नगरसेवक, राजू बनकर, गौतम चिकाटे, सुरेश खापने, राजू दास, प्रमोद कावळे, राजेंद्र आत्राम, राजी काझी, छोटूभाई कपडेवाले, बंडोपंत तातावार, राजकुमार रेवल्लीवार अनेक मुस्लीम बांधव, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस कमिटीची बैठक
By admin | Updated: June 16, 2017 00:36 IST