शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:45 IST

महाराष्ट्र धनगर समाज महासंघ (प्रणित) मल्हारसेना व अहिल्या महिला संघ जिल्हा चंद्रपूर या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देसमाजबांधवांची मागणी : त्या मेंढपाळांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र धनगर समाज महासंघ (प्रणित) मल्हारसेना व अहिल्या महिला संघ जिल्हा चंद्रपूर या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.गडचिरोलीमध्ये महापूर आला. त्यात खंदला राजाराम, ता. अहेरी, येथील अनेक मेंढपाळांच्या मेंढ्या वाहून गेल्या. अहेरीचे तहसीलदार यांनी पंचनामा करुन पूरग्रस्थांचा अहवाल जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पाठविला असून त्यात बिरा पैका मुर्कीवार यांच्या ३१९ मेंढ्या व भिमा पैका बोर्लावार यांच्या ३०२ मेंढ्या वाहून गेल्याचे नमूद आहे. या दोन्ही मेंढपाळाकडे मेंढ्या चराऊ पासेस उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनाच पूरग्रस्थांच्या अहवालात स्थान दिले आहे. ज्या मेंढपाळांकडे मेंढ्या चराऊ पासेस नाही, अशा मेंढपाळाचा पूरग्रस्थांच्या अहवालात समावेश नाही. यात श्रीकांत राजू येगेवार यांच्या ४८ मेंढ्या, प्रकाश बिरा येगेवार यांच्या ५१ मेंढ्या, कल्पना रमेश मंडलवार, नांदगाव यांच्या ३९ मेंढ्या, लचमा बिरा अन्नावार यांच्या ४१ मेंढ्या, किसन पोचू कंकलवार यांच्या ३५ मेंढ्या, मल्ला लिंग डंकरवार यांच्या ४२ मेंढ्या, मार्कंडी मिटपल्लीवार रा. कुदरसी टोला यांच्या ४२ मेंढ्या, नितेश भिमा बोर्लावार यांच्या ४६ मेंढ्या, पैका भिमा बोर्लावार यांच्या ३८ मेंढ्या, जयेश भिमा बोर्लावार यांच्या ४३ मेंढ्या, भानेश पोचू कंकलवार यांच्या ४१ मेंढ्या वाहून गेल्या आहेत. हे सर्व मेंढपाळ, मौजा भंगाराम तळोधी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून या मेंढपाळाची अहेरी तहसीलदारांनी मेंढ्या पुरात वाहून गेल्याची पंचनाम्यात नोंद केली नाही. त्यामुळे या मेंढपाळांना नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यांच्याही नुकसानीचा अहवाल तयार करून महाराष्ट्र शासनाला पाठविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ जि. चंद्रपूर यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष योगीराज उगे, गुलाब चिडे, गौरव नवले, पपिता येडे रमेश बुचे, नितेश खांडाळकर, दत्तात्रय येडे व समाज बांधव उपस्थित होते.