शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील अधीक्षक पद भरतीवर संभ्रम

By admin | Updated: November 19, 2014 22:37 IST

महानगर पालिकेद्वारे शहरातील आरोग्यकेंद्रांमार्फत तीन ते साडेतीन लाख नागरिकांना आरोग्यसेवा पुरविली जात आहे. या केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधीक्षकपदाची गरज आहे.

चंद्रपूर : महानगर पालिकेद्वारे शहरातील आरोग्यकेंद्रांमार्फत तीन ते साडेतीन लाख नागरिकांना आरोग्यसेवा पुरविली जात आहे. या केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधीक्षकपदाची गरज आहे. नोडल अधिकारी तथा माहिती अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी ही भरती प्रक्रिया राबविली नसल्याचे, तर उपायुक्तांनी अपिलीय सुनावणीमध्ये भरतीचे आवेदनपत्र स्वीकारल्याची माहिती दिली. मनपातील दोन जबाबदार अधिकाऱ्यांनी वेगवेगळी माहिती दिल्याने ही भरती प्रक्रिया राबविली किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. माहिती अधिकारात अपुरी माहिती दिल्याने याविरोधात राज्य माहिती आयुक्तांकडे दुसरे अपील करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन बन्सोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार अडीच वर्षापूर्वी चंद्रपूर नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. शासन अनुदानित जीआयए अंतर्गत पाच, तर आरसीएच फेज टू अंतर्गत पाच, अशा एकूण दहा आरोग्य केंद्रामार्फत नगरवासीचे आरोग्य सांभाळल्या जात आहे. या आरोग्य केंद्रांवर आरोग्य वैद्यकीय अधीक्षक नियंत्रण ठेवून असतात. मात्र मागील अनेक वर्षापासून या पदाची भरती प्रक्रिय राबविण्यात आलेली नाही.नगरपालिका अस्तित्वात असताना तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी १ आॅगस्ट २००९ रोजी डॉ. अंजली आंबटकर यांची नोडल आॅफिसर (आसीएच) म्हणून नियुक्ती केली होती. तेव्हापासून तर आजतागायत डॉ. आंबटकर या महानगरातील आरोग्यकेंद्रांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याचे काम करीत आहेत. यासंदर्भात नितीन बन्सोड यांनी माहितीच्या अधिकारातून आरोग्य वैद्यकीय अधीक्षक या पदासंदर्भात माहिती मागितली. तेव्हा माहिती अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याची माहिती दिली. परंतु स्वत:च्या शैक्षणिक पात्रतेची माहिती दिली नाही. त्यामुळे बन्सोड यांनी उपायुक्तांकडे प्रथम अपील केले. त्यानुसार झालेल्या सुनावणीत उपायुक्तांनी या भरती प्रक्रियेत आवेदन स्वीकारल्याचे सांगितले. परंतु या पदाच्या पात्रतेची माहिती न दिल्याने बन्सोड यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे दुसरे अपील सादर केले आहे. या पदासाठी वैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि स्वच्छता, साथ आजार व अन्य कामांचा सात वर्षाचा अनुभव, अशी पात्रता ठरविण्यात आली आहे. ही पात्रता डॉ. आंबटकर यांच्याकडे नसल्याने ही भरती प्रक्रिया पारदर्शक राबवावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)