निळकंठराव हळदे महाराज : मानवता हाच खरा धर्मघुग्घुस : मानवता धर्म मेरा, इंसान ही पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना ही धर्म मेरा हा मंत्र मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिला. हा मंत्र अंगी बाळगावा, असे प्रतिपादन गुरूकुंज मोझरीचे निळकंठराव हळदे महाराज यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण व संताच्या स्मृती प्रित्यार्थ आयोजित सर्वधर्म परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्वधर्म परिषदेचे उद्घाटनाप्रसंगी घुग्घुस येथील सीएनए चर्चचे जान जार्ज, धम्मचारी बौद्ध प्रतिनिधी मनोहर कवाडे, इस्लाम धर्माचे सामिउल्ला खान, गुरुद्वारा कमेटीचे समनसिंग आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्धवराव गाडेकर महाराज होते.यावेळी गुरूकुंज मोझरीचे निळकंठराव हळदे महाराज म्हणाले, घुग्घुस येथे मागील १२ वर्षांपासून धर्म परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. अशा परिषदेची आज गरज आहे. असे ते म्हणाले. दोन दिवसीय कार्यक्रमात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर महिला मेळाव्याचे उद्घाटन इंदिरा ग्रामीण विद्यालय पडोलीच्या मुख्याध्यापिका संध्या गोहोकार यांचे हस्ते करण्यात आले. तर विशेष अतिथी म्हणून चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष प्रतिभा जीवतोडे उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून अमरावती टाकडखेडच्या पौर्णिमा सवाई तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शनी कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता ठाकरे, सरपंचा पुष्पा मेश्राम, माजी पं.स. सदस्या नवले उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांना प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी रक्तदान शिबिर, स्वरबंध, भजनसंध्या व उद्धव गाडेकर महाराजाचे राष्ट्रीय प्रबोधनात्मक जाहीर किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी मंचावरील सर्व धर्मियांच्या मान्यवरांनी आपल्या धर्माबद्दल विस्तृत माहिती देवून मानवता प्रेम बंधू भावना अंगी बाळगण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन रमाकांत मांढरे तर आभार प्रा. चंद्रशेखर बोबडे यांनी केले. या कार्यक्रमात सर्वधर्मियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे अध्यक्ष प्रेमलाल पारधी, जयंत जोगी, शामराव बोबडे, सुरेश ठवस, नथ्थू बल्की, गोपाळ शिरपूरकर, रमाकांत मांढरे, इबादुल सिद्धीकी, राजेंद्र घोटकर, आदींनी अथक परिश्रम घेतले. (वार्ताहर)
राष्ट्रीय प्रबोधनात्मक कीर्तनाने सर्वधर्म परिषदेचा समारोप
By admin | Updated: February 19, 2017 00:39 IST