शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
3
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
4
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
5
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
6
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
7
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
8
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
9
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
10
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
11
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
12
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
13
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
14
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
15
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
16
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
18
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
19
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
20
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 15:52 IST

गिरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी नागपूरच्या कार्यालयाने प्रदान केली आहे. मंगळवारच्या तारखेत ही परवानगी असली तरी तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना ही परवानगी बुधवारी दुपारनंतर मिळाली अशी माहिती आहे.

ठळक मुद्दे पिल्लांजवळच करावे लागणार बेशुद्ध पिल्लांना एका जागेवर ठेवून जर ती भक्षासाठी काही अंतरावर गेली व ती दिसून आली तरी तिला बेशुद्ध करता येणार नाही. बेशुद्ध करतेवेळी तिची पिल्ले तिच्याजवळ असणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघनश्याम नवघडेचंद्रपूर- गिरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी नागपूरच्या कार्यालयाने प्रदान केली आहे. मंगळवारच्या तारखेत ही परवानगी असली तरी तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना ही परवानगी बुधवारी दुपारनंतर मिळाली अशी माहिती आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून गिरगाव परिसरात एका वाघिणीचा तिच्या चार पिल्लांसह धुमाकूळ सुरू आहे .दोन गोºहे ठार करून दोन शेतकऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्नही या वाघिणीने केला होता. परिणामी संपूर्ण गिरगाव परिसर दहशतीखाली आला होता. एवढेच नाही तर जंगल परिसरातील शेतकऱ्यांनी शेतावर जाणेही बंद केले होते. दरम्यान गिरगाववासियांनी एकत्र येऊन वाघिणीचा बंदोबस्त करा अशी एकमुखी मागणी करून वनाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. या वाघिणीच्या कारवायांची दखल पालकमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा घेतली. त्यांनीही वाघिणीचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले होते. या घडामोडीनंतर तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी नागपूरच्या कार्यालयाकडे वाघिणीच्या बंदोबस्ताची परवानगी मागितली होती.व तसा प्रस्तावही सादर केला होता.सोनटक्के यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर तीन दिवसातच नागापूरच्या कार्यालयाने बंदोबस्तास परवानगी दिली असली तरी अनेक अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. एकदमच या वाघिणीला बेशुद्ध करता येणार नाही. अगोदर या वाघिणीला हुसकावण्याचा प्रयत्न वनविभागाला करावा लागणार आहे. यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात तिचा जंगलाच्या दिशेला हाकारा करणे, फटाके फोडणे, नाली साफ करणे आदी मार्गांचा समावेश आहे. या उपायांना जर ती बधली नाही व पुन्हा त्याच परिसरात तिचा वावर दिसला तरच तिला बेशुद्ध करून पकडता येणार आहे. यातही उल्लेखनीय बाब अशी की ही परवानगी १० एप्रिल २०१८ पर्यंतच आहे.समितीच्या शिफारशीनुसारवाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील याच्या शिफारशीसाठी एका समितीचे गठण करण्यात आले होते. या समतिीत सरपंच , उपसरपंच , पोलिस पाटील ,डी एफ ओ, आर एफ ओ यांचा समावेश करण्यात आला होता .या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही परवानगी देण्यात आली.

टॅग्स :Tigerवाघ