शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उपोषणकर्ते नारायण जांभुळेंची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:26 IST

माना समाजाच्या आदेशाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी व परिसरातील विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारीपासून साखळी व आमरण उपोषणाला तहसील कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आली. मात्र पाचव्या दिवशी उपोषणकर्ते नारायण जांभुळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउपजिल्हा रुग्णालयात दाखल : आमरण व साखळी उपोषणाचा पाचवा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : माना समाजाच्या आदेशाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी व परिसरातील विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारीपासून साखळी व आमरण उपोषणाला तहसील कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आली. मात्र पाचव्या दिवशी उपोषणकर्ते नारायण जांभुळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.उच्च न्यायालयाने वेळोवेळी माना समाजाच्या पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणीकरिता विदर्भातील माना समाजाने शासनाला निवदने दिली होती. मुख्यमंत्री यांनी दखल घेवून दोन महिण्यात परिपत्रक काढू, असे सांगितले. मात्र अजूनही शासनाने परिपत्रक काढले नाही. त्यामुळे विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभुळे हे आमरण उपोषणाला बसले आहे. पोटात अन्न नसल्याने त्यांचा रक्तदाब वाढला आहे. शरिरातील साखरेचे प्रमाणही वाढले. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात त्यांना भरती केले आहे.त्यांच्या बरोबर शनिवारला तालुक्यातील माजी ग्रा.प. सदस्य रामदास जांभुळे, पंजाबराव दोडके, नगरसेविका हेमलता नन्नावरे, वनिता नन्नावरे, वनिता जांभुळे, सचिन श्रीरामे, सचिन मानगुडधे, सुखदेव ढोणे, सखाराम दोडके, तुकाराम नन्नावरे, अक्षय सोनवाने, चंदू दोडके, आदी माना समाज बांधव साखळी उपोषणाला बसले आहे.जात प्रमाणपत्र वैधता सहा महिण्यात निकाली काढावी, जनहित याचिका ७१ / २०११ नुसार जलद प्रक्रिया व्हावी यासाठी प्रक्रियेत सुधारणा, ओबीसीच्या जीआरच्या यादीत क्र. २६८ वर मागा चा उल्लेख माना करण्यात आल्याने शुध्दीपत्रक प्रसिद्ध करावे, न्यायालयाच्या आदेशानुसार माना, माने, मानी, इत्यादी एकच असल्याबाबत परिपत्रक काढणे, डोमा गावाजवळील मुक्ताई देवस्थानाला पर्यटनस्थळ घोषित करण्यात यावे, सुरजगाढ किल्ला स्थित डोंगरावरील ठाकूर देव, देवस्थानच्या जवळपास खनन न करण्याचे आदेश द्यावे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी दीडशे माना समाजबांधव साखळी उपोषणाला बसले आहेत.अन्यथा उपोषण सोडणार नाहीदरम्यान आमदार कीर्तीकुमार भांगडिया,आदिवासी प्रकल्प अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी उपोषणकर्ते नारायण जांभुळे यांना आपल्या मागल्या शासनापर्यत पोहचवितो. आपण उपोषण सोडावे, अशी विनंती केली. मात्र जोपर्यत शासन माना समाजाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करून परिपत्रक निर्गमित करणार नाही. तोपर्यत उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्ता जांभुळे यांनी सांगितले.