शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: June 8, 2017 00:35 IST

कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरात सुरू असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांनी सहभागी होत जिल्हा बंदचे आवाहन केले होते. याला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून अनेक तालुक्यातील व्यापारी प्रतिष्ठाने, पेट्रोलपंप बंद होते.आज बुधवारी सकाळी ८ वाजता स्थानिक गांधी चौकात विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित झाले. गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गे रॅली काढण्यात आली व रॅलीच्या माध्यमातून व्यापारी वर्गाला बंदचे आवाहन करण्यात आले. वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते गटागटाने शहरातील विविध भागात फिरत होते व बंद यशस्वी करण्याकरिता प्रयत्नरत होते. यावेळी आमदार बाळु धानोरकर, राहुल पुगलिया, शिवसेना जिल्हा प्रमुख सतिश भिवगडे, किशोर जोरगेवार, चंद्रपूर शहर विकास आघाडीचे गटनेता नगरसेवक पप्पू देशमुख, संदिप गिऱ्हे, रमेशचंद्र दहिवडे, किशोर पोतनवार, सुरेश पचारे, गजानन गावंडे, नंदु नागरकर, वसंत मांढरे, संदिप गड्डमवार, राजेंद्र वैद्य, डॉ. सुरेश महाकुळकर, देवेंद्र बेले, प्रवीण खोब्रागडे, देशक खोब्रागडे, सुनिता लोढीया, भारती दुधानी, बेबी उईके, हिराचंद बोरकुटे, चंद्रकांत पोडे, नामदेव कन्नाके, विशाल निंबाळकर, निलेश मानकर, संगीता भोयर, सायली येरणे, स्नेहल रामटेके, निलेश खोब्रागडे, संजय महाडोळे आदी अनेक राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीच्या पूर्वी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समुहाला संबोधित केले. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला. मोदी सरकार व महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला.संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे - चटपराज्यात शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना संपुर्ण कर्जमुक्ती दिलीच पाहिजे, असे मत यावेळी शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप व्यक्त केले. राज्यातील शेतकऱ्यांना संरक्षण मिळणे गरजेचे असून जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार नाही, तोपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहील, असे नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले.