सातत्य कायम : इको-प्रोच्या युवकांचा उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इको-प्रोच्या वतीने चंद्रपुरातील किल्ले व परकोट स्वच्छता अभियानांतर्गत सुरू असलेल्या स्वच्छता सत्याग्रहास रविवारी १५ दिवस पुर्ण झाले आहे. या स्वच्छता मोहिमेत इको-प्रो कार्यकर्ते व तरुणांनी आपले सातत्य कायम ठेवले आहे. १२५ दिवस पूर्ण झाल्यानिमित्त स्थानिक आझाद गार्डन व शहरात पत्रके वाटून रविवारी जनजागृतीही करण्यात आली.चंद्रपूर शहरातील ऐतीहासिक गोंडकालीन किल्ला म्हणजे आपला ऐतीहासिक वारसा. त्याचे संवर्धन व्हावे ही अनेकांची इच्छा होती. मात्र पुढाकार घ्यायला कुणीही तयार नव्हते. दरम्यान, इको-प्रो संस्थेच्या वतीने १ मार्च २०१७ पासून शहरातील किल्ले व संपूर्ण पराकोट स्वच्छ करण्यास सुरुवात केली. नियिमत रोज सकाळी श्रमदान करून किल्ला स्वच्छता अभियान कार्यकर्ते राबवित आहेत. या अभियानास आज १२५ दिवस पुर्ण झाल्याने आज सकाळी मोहिमेला जाण्यापूर्वी आझाद गार्डन येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांना पत्रके वाटीन सदर अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांना किल्ला स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.उल्लेखनीय असे, या किल्लावर मोठया प्रमाणात घर बांधकामानंतरचे वेस्ट, शौचालयाचे खड्डे खोदल्यानंतरची माती, नाल्या साफ केल्यानंतरची गाळ, शिळे अन्न आदी टाकण्यात आले होते. गेल्या कित्येक वर्षात याची सफाई करण्यात आली नसल्याने किल्लावर संपुर्ण घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याचे चित्र होते. अभियानात सहभागी सदस्यांनी अत्यंत मेहनतीने ही सर्व घाण स्वच्छ केली. पुढे किल्ला स्वच्छतेनंतर या भागातील नागरिकांनी कचरा करू नये, किल्लाची सुंदरता बाधित करू नये, याकरिता आज रविवारी सदस्यांनी जनजागृती केली. सदर अभियानात नियिमत २५-३० सदस्य श्रमदान करीत आहे. मागील १२५ दिवसांपासून हे अभियान अविरत सुरू आहे. शहरातील युवकांनी व महाविदयालयीन विद्यार्थ्यानीसद्धा या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केले आहे. जनजागृती अभियानासाठी प्रा डॉ इसादास भडके व इको-प्रो संस्थेचे नितीन बुरडकर, नितीन रामटेके, संजय सब्बनवार, रवींद्र गुरनुले, बिमल शहा, मनीष गांवडे, अनिल अडगूरवार, राजू हाडगे, कपील चौधरी, सचिन धोतरे, सुधीर देव, सुरज गुंडावार, धर्मेंद्र लुनावत आदी उपस्थित होते.आतापर्यंत या ठिकाणी केली स्वच्छताया अभियान अंतर्गत आतापर्यत पठाणपुरा गेट परीसर, अंचलेश्वर गेट, जटपुरा गेट परीसर, हनुमान खिडकी, मसन खिडकी, बगड खिडकी, चोर खिडकी, रामाळा तलाव रोड, ताडबन-रामटेके वाडी, आदी परीसरातील किल्ला, किल्लाच्या भिंती, बुरूजे, खिडक्या आणी मुख्य गेट याची स्वच्छता करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत चोर खिडकी व आंबेकर लेआउट परीसरातील किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या सुरवातीस किल्लावरील झाडे-झुडपे, वृक्ष-वेली तोडून स्वच्छ करण्याचा व फक्त मुख्य गेटवर अभियान राबविण्याचा उपक्रम असताना, पुढे-पुढे सदर अभियानात संपुर्ण किल्ला, किल्लाची बुरूजे आणी भिंती स्वच्छ करण्यात येत आहे..
किल्ला स्वच्छतेचे १२५ दिवस पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 00:23 IST