शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करा

By admin | Updated: May 19, 2016 00:44 IST

टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाची प्रस्तावित कामे मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी टेंभुर्डा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश : चंद्रपूर जिल्ह्यातील समस्यांवर मुंबईत बैठकचंद्रपूर : टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाची प्रस्तावित कामे मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी टेंभुर्डा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिले.टेंभुर्डा उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुबंईच्या सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय रसायने व खत राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, वरोराचे उपविभागीय अधिकारी लोंढे, जिल्हा खनिकर्म अधिकारी आवाडे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकल्पावर आतापर्यंत १९३५.५५ कोटी रुपये एवढा खर्च झाला असून सन २०१६-१७ साठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्य कालव्याची ६५ किमी लांबी पूर्ण करण्यासाठी नियोजन झालेले आहे. उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या जादा मोबदल्यासंदर्भात शासन सकारात्मकचंद्रपूर : जिल्ह्यात असलेल्या वर्धा नदीवरील दिंडोरा बॅरेज प्रकल्पाच्या संपादित जमिनीसाठी देण्यात आलेल्या मोबदल्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितले. दिंडोरा बॅरेजसाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा शेतकऱ्यांना अल्प मोबदला देण्यात आला आहे. हा मोबदला वाढवून मिळावा, अशी मागणी ना. अहीर यांनी केली. या प्रकल्पासाठी एकूण १४०० हेक्टर जमिनीपैकी ११०० हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून त्याचा मोबदला देण्यात आला आहे. आणखी ३०० हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. जमीन अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळावा, अशी शासनाची भूमिका आहे. या प्रकल्पाचा लाभ उद्योगांना होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील शेतकऱ्यांना उद्योग विभागामार्फत जास्त मोबदला देता येईल का याचा शासन विचार करेल, असे सांगितले.