शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

जन-वन विकास योजनेतून ताडोबात २९ कोटींची कामे पूर्ण

By admin | Updated: September 20, 2016 00:40 IST

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना ताडोबाच्या बफर क्षेत्रातील गावांसाठी विकासाला चालना देणारी ठरली आहे.

३८ हजार ४७४ कामे पूर्ण : ताडोबाचे बफर क्षेत्र विकासाकडेचंद्रपूर : डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना ताडोबाच्या बफर क्षेत्रातील गावांसाठी विकासाला चालना देणारी ठरली आहे. या योजनेसह वन विभागाच्या विविध योजनेंतर्गत या गावांमध्ये तब्बल ३८ हजार ४७४ कामे करण्यात आली आहेत. यावर २९ कोटी सात लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातून पायाभूत विकासासह अत्यावश्यक गरजांची अनेक कामे पूर्ण झाल्याने ही योजना गावकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे. वन विभागाच्यावतीने ताडोबा बफर क्षेत्राच्या विकासाठी विविध प्रकारच्या योजना, उपक्रम राबविले जात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने या योजना राबविल्या जातात. विभागाच्या विविध योजनांसह नव्याने सुरू झालेल्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेंतर्गतही अनेक कामे हाती घेण्यात आली आहे. त्यातून बफर क्षेत्रात सध्या विकासाची हजारो कामे होत आहेत. गावांच्या गरजा लक्षात घेता कामे हाती घेण्यात येत असल्याने बफरमधील गावे स्वयंपूर्णतेकडे जात आहे. ७२ प्रकारची विविध कामे या क्षेत्रात घेतली जात आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये ई-लर्निंग सुविधेची १०१ कामे, सहा हजार ५६४ पाणी फिल्टर यंत्रांचा पुरवठा, ४२९ दुधाळू जनावरांचे वाटप, १९ हजार ६१९ एलपीजी गॅसचा पुरवठा, दोन हजार २६६ शौचालयांचे बांधकाम, ४३६ विहीरींच्या कठड्यांचे बांधकाम अशा मुलभूत बाबींचा समावेश आहे.आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांमध्ये जन-वन योजनेतून १९ हजार ४७७ तर इतर योजनेतून १८ हजार ९९७ अशा एकूण ३८ हजार ४७४ कामांचा समावेश आहे. ताडोबाच्या बफर जंगलासह वाघ व अन्य प्राण्यांचे रक्षण करून ताडोबाला आंतरराष्ट्रीय दजार्चा व्याघ्र प्रकल्प म्हणून विकसित करण्यासाठी बझर क्षेत्रातील गावांचा मोठा हातभार लागला आहे. त्यामुळे ही गावे विकासाच्या बाबतीत मागे राहू नये म्हणून जन-वन विकास योजना राबविली जात आहे. जन-वन व विभागाच्या इतर योजनेतून बफर क्षेत्रातील या गावांवर २९ कोटी सात लाख रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)विविध कामे पूर्णत्वासचार हजार ८८ गॅस ओट्यांचे बांधकाम, एक हजार ९८३ दगडी बंधारे, आठ मृद संधारणाची कामे, १९ सिमेंट बंधारे, १४२ तलावांचे खोलीकरण, ३६ बोअरवेल, पाच विहीरींचे बांधकाम, ३९ सोलर पंप, सात अगरबत्ती प्रकल्प, तीन चरखा उद्योग, २४ गाई गोठ्यांचे बांधकाम, ४६ स्मार्ट अंगणवाडी, ८५ हेक्टरवर दोन रोपवनांची निर्मीती, ४५० सोलर लाईट, ६९० सोलर कुंपन, १५ बांबू प्रकल्प प्रशिक्षण, ३६ पर्यटन जिप्सीसाठी अर्थसहाय्य यासह बोटींग प्रकल्प, जोडधंद्यासाठी मत्स्यव्यवसाय, दुधप्रकल्प, कुक्कुटपालन अशा कामांचा समावेश.