शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयाचे काम वेगाने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:24 IST

येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करा, ते सर्वोत्तम होईल, याची काळजी घ्या, अशा सूचना राज्याचे वित्तमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत ना. मुनगंटीवार यांनी वरीच सूचना दिल्या.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपर : येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करा, ते सर्वोत्तम होईल, याची काळजी घ्या, अशा सूचना राज्याचे वित्तमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत ना. मुनगंटीवार यांनी वरीच सूचना दिल्या. यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीला खा. विकास महात्मे, भारत सरकारची कंपनी एच.एस.सी. सी.चे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी करता यावी यासाठी खा. विकास महात्मे यांनी त्यांच्या खासदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी सुधारित ९७३ कोटी रुपयांच्या बांधकाम आराखड्याला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि रुग्णालयाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यास जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण विदर्भातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत.नागरिकांची ही गरज ओळखून रुग्णालयाचे काम जलदगतीने होणे गरजेचे आहे. त्यासाठीच भारत सरकारच्या एच.एस.सी.सी इंडिया लि. ची निवड करून त्यांच्याकडे हे काम सोपविण्यात आले आहे. ते काम लवकरच पूर्ण करतील, असेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाने या कंपनीसमवेत सामंजस्य करार केला आहे, असेही ना. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.