शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 00:38 IST

राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेचे कामे व जलसंधारणाची, विहिरीची विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहेत.

संजय धोटे : राजुरा येथे आढावा बैठकलोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेचे कामे व जलसंधारणाची, विहिरीची विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहेत. गावाच्या एकोप्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. जलयुक्त शिवार योजनेची रखडलेली कामे तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश आ. अँड .संजय धोटे यांनी दिले.राजुरा तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत आ. धोटे बोलत होते. जलयुक्त शिवाराची कामे अधिक चांगले प्रकारे करण्याकरिता गावकऱ्यांना सोबत घेऊन नियोजन करावे. त्याची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतला व पंचायत समितीला देणे अनिवार्य आहे. जलयुक्त शिवार योजनतून सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल, असे सांगून त्यांनी इतर विभागाचा आढावा घेत प्रलंबित कामे, रोजगार हमी योजना, जवाहर सिचन योजना, प्रमुख ग्रामीण रस्त्याची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश  अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मंचावर राजुरा, कोरपना, जिवती पंचायत समितीचे सभापती व उपसभापती, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती, तसेच सपूर्ण जिल्हा परिषद सदस्य, प.स.सदस्य, अशासकीय कमेटीचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.राजुरा तालुक्याचा आढावाराजुरा तालुक्यातील सर्व विकास कामांचा आढावा व नियोजनबाबत गटांतर्गत सर्व कार्यकारी यंत्रणा प्रमुख व योजना राबविणारे अधिकाऱ्यांची सभा आ. अ‍ॅड. धोटे  यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत त्यांनी कृषी विभाग, बांधकाम विभाग, स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, पंचायत विभाग, पाणी टंचाई नळ योजनेची,  आरोग्य विभाग, आदी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण तालुक्याचा विकास आढावा घेतला. जे अधिकारी काम योग्यरीत्या करीत नसतील, त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.