शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जादुटोण्याची तक्रार दखलपात्र व अजामीनपात्र

By admin | Updated: September 27, 2014 01:26 IST

महाराष्ट्रात दरवर्षी जादुटोण्याच्या संशयावरुन अनेक लोकांचे बळी जातात. याची दखल घेऊन आणि अंधश्रद्धा निर्मूलन..

सिंदेवाही : महाराष्ट्रात दरवर्षी जादुटोण्याच्या संशयावरुन अनेक लोकांचे बळी जातात. याची दखल घेऊन आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३’ हा कायदा लागू करण्यात आला. त्यातही चंद्रपूर जिल्हा अंधश्रद्धाबाबात अतिशय संवेदनशील आहे. या जिल्ह्यात असे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरिभाऊ पाथोडे यांनी केले आहे. या जिल्ह्यात दरवर्षी जादुटोणा, भूतकरणी, गुप्तधन या अंधश्रद्धापोटी बळी दिल्या जातो वा घेतल्या जातो. यावर्षी जुलै महिन्यात बल्लारपूर शहराजवळ बामणी गावात गुराख्याची जादुटोण्याच्या संशयापायी केलेली हत्या ताजी आहे. तरीही या घटनांची दखल घेवून चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ हा कायदा लागू केला नाही, असे चित्र दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात जादुटोण्याच्या तक्रारी येत आहेत. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ कलम २ पोटकलम (१) (ख) नुसार अनुसूचीमधील सहा क्रमांकाच्या बाबीनुसार एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते किंवा भूत लावते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत तसा संशय निर्माण करणे, त्रासदायक कृत्य करणे वा कठीण करणे हा अपराध दखलपात्र व अजामिनपात्र आहे. अशा गुन्ह्यांसाठी दोषी असलेली व्यक्ती, दोष सिद्ध झाल्यानंतर सात वर्षांपर्यंत फसू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि ५० हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र आहे. या अधिनियमानुसार तक्रार दाखल केल्या जात नाही. सर्व तक्रारी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवून घेतात आणि न्यायालयात दाद मागण्याची समज देतात. (तालुका प्रतिनिधी)