शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांबाबत रामनगर ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:02 IST

शासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. शेतकरीविरोधी धोरणे घेऊन एक प्रकारे शेतकºयांचा खूनच करीत आहे.

ठळक मुद्देशासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. शेतकरीविरोधी धोरणे घेऊन एक प्रकारे शेतकºयांचा खूनच करीत आहे. या गुन्ह्यासाठी सरकारवर खटले दाखल करण्यात यावे, या आशयाची तक्रार शेतकरी संघटनांची सुकाणू समिती व किसान क्रांतीच्या वतीने आज शुक्रवारी रामनगर ठाण्यात केली.सरकारने सातत्याने शेतकरीविरोधी धोरणे घेतली आहेत. सरकारच्या या धोरणांमुळे शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. शेतकºयांच्या सरकारने केलेल्या या हत्याच आहेत. चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर शेतकºयांनी आंदोलन करीत सरकारकडे कर्जमुक्तीची मागणी केली. सरकारला आंदोलनामुळे कर्जमुक्तीची घोषणा करावी लागली. पण कर्जमुक्त करताना मात्र सरकारने आपले आश्वासन व शब्द न पाळता अनेक अटी लावत शेतकºयांची घोर फसवणूक केली आहे.सरकारने कर्जमाफीसाठी जाणीवपूर्वक आॅनलाईनचा व अटीशर्तीचा गोंधळ घातला आहे. लाखो शेतकरी या गोंधळामुळे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. केवळ निम्म्याच शेतकºयांना कर्जमाफीसाठी अर्ज भरता आले व उर्वरित तब्बल ३१ लाख शेतकरी कर्जमाफीचे साधे अर्जसुद्धा भरु शकले नाही. अर्ज भरलेल्या ५८ लाख शेतकºयांपैकी जे शेतकरी सरकारच्या अटीमध्ये बसतील, त्यांनाच केवळ कर्जमाफीचा लाभ होणार आहे. परिणामी अत्यंत थोड्या शेतकºयांना कर्जमाफी मिळणार असून बहुतांश शेतकरी कर्जमाफीतून वगळले जाणार आहे.शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीने सरकारच्या या ऐतिहासिक फसवणूकीचा बुरखा वारंवार फाडला आहे. जळगाव येथे झालेल्या राज्यव्यापी परिषदेतही सुकाणू समितीने सरकारची ही लबाडी लोकांच्या समोर उघड करुन याविरोधात रणशिंग फुंकण्याची हाक दिली आहे.दरम्यान, आज शुक्रवारी दुपारी २ वाजता सुकाणू समिती व किसान क्रांतीचे कार्यकर्ते जटपुरा गेट येथे जमा झाले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. सरकावर फसवणुकीचा ४२०, शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा ३०६ व शेतकºयांच्या हत्या केल्याप्रकरणी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत केली. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, प्रदीप बोबडे, बापुराव मडावी, गणेश झाडे, मारोती बुरवटकर, प्रकाश ताजने, ज्ञानेश आत्राम, महेश धोंगडे आदी उपस्थित होते.