शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाई द्या, अन्यथा कार्यालयाला कुलूप ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:38 IST

वरोरा तालुक्यातील वरोरा ते रायपूर (राजनांदगाव ) विद्युत कंपनीचे टॉवर उभारणीचे काम सुरू असून काही ठिकाणी टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. टॉवर लाईनच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देटॉवर लाईनचे काम : बाळू धानोरकर यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा तालुक्यातील वरोरा ते रायपूर (राजनांदगाव ) विद्युत कंपनीचे टॉवर उभारणीचे काम सुरू असून काही ठिकाणी टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. टॉवर लाईनच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. मात्र त्यांना अद्यापही नुकसानीचा मोबदला देण्यात आला नाही. शेतकऱ्यांवर हा अन्याय दूर करावा, अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा आ. बाळू धानोरकर यांनी दिला आहे.या कामामुळे बाधित शेतकऱ्यांना ३१ मे २०१७ च्या शासननिर्णयानुसार मोबदला वाटपाची कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच टॉवर उभारणीचे कामे पूर्ण करण्यास संबंधित कंपनीला निर्देश देण्याबाबत यापूर्वीच निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांचे लेखी स्वरूपात अर्ज सादर करूनही कंपनीने कोणत्याही प्रकारचा नुकसानीबाबतचा मोबदला न देता पोलिस संरक्षणामध्ये दबाव तंत्राचा वापर करून टॉवर उभारणीचे काम केले आहे, असे आ. धानोरकर यांनी म्हटले आहे.ज्या ठिकाणी टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. तेथील बाधित शेतकऱ्यांना पिकांचा योग्य मोबदला देण्यात आला नाही. शेतकऱ्यांना सदर शासन निर्णयानुसार मदतीचे पूर्ण वाटप करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील शेतकऱ्यांना मोबदला दिल्या जात नाही, ही अतिशय खेदजनक बाब आहे. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून असे निदर्शनास आले की, सदर कंपनीचे कर्मचारी तिवारी हे शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना जादा मोबदल्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रक्कम उकळतात, असेही आ. धानोरकर यांनी म्हटले आहे.याबाबत वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेतच आहेत. यामुळे त्यांची विवंचना वाढली आहे. १९ नाव्हेंबरपर्यंत सदर कंपनीकडून बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीबाबत मोबदला न मिळाल्यास २० नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यलायाला कुलूप ठोकण्याचा इशारा आ. धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.