शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुनगंटीवार यांनी साधला नागरिकांशी सुसंवाद

By admin | Updated: November 29, 2015 01:52 IST

बल्लारपूर शहरातील गोकुलनगर वॉडार्तील कादरिया मस्जीद चौकात लाल दिव्याची गाडी ताफ्यासह पोहचते,

१४ वॉर्डात घेतल्या सभा : जनता आनंदली, तक्रारी व सूचनांचा वर्षावबल्लारपूर : बल्लारपूर शहरातील गोकुलनगर वॉडार्तील कादरिया मस्जीद चौकात लाल दिव्याची गाडी ताफ्यासह पोहचते, या ताफ्यात फिरते जनसंपर्क कार्यालय सुध्दा असते, लाल दिव्याच्या गाडीतून राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सहकाऱ्यांसह उतरतात आणि सुरू होतो नागरिकांशी सुसंवाद. एकाच दिवशी बल्लारपूर शहरातील तब्बल १४ वॉर्डात फिरून ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी या भेटीने मोहरून जात तक्रारी व सूचनांचा वर्षाव केला. राज्याचे वित्त व वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शनिवारी बल्लारपुर शहरातील १४ प्रमुख चौकांमध्ये चौक जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी सुसंवाद साधला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हरीश शर्मा, बल्लारपुर भाजपाचे अध्यक्ष शिवचंद द्विवेदी, रेणुका दुधे, अजय दुबे, निलेश खरबडे, किशोर मेश्राम, मनीष पांडे, धर्मप्रकाश दुबे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.कादरीया मस्जीद चौकानंतर विवेकानंद वॉर्ड, दिनदयाल वॉर्ड, मौलाना आझाद वॉर्ड, झाकीर हुसैन वॉर्ड, महाराणा प्रताप वॉर्ड, दादाभाई नौरोजी वॉर्ड, गणपती वॉर्ड, बालाजी वॉर्ड, महात्मा गांधी वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड, लोकमान्य टिळक वॉर्ड, साईबाबा वॉर्ड, गौरक्षण वॉर्ड परिसरातील प्रमुख चौकांमध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जनसंपर्क करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बल्लारपूर शहराच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याची ग्वाही देत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या शहरातील नागरिकांनी भरभरून प्रेम दिले आहे. पाणी पुरवठा योजना, नाटयगृहाचे बांधकाम, उपकोषागार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, स्टेडियमची निर्मिती, अशी विकासकामांची मोठी मालिका या शहरात आपण निर्माण केली आहे. नुकताच या शहराच्या विकासासाठी ३० कोटी रू. निधी आपण मंजूर करविला आहे. येत्या काळात २० कोटी रू. निधीला मंजुरी मिळणार आहे. या ५० कोटी रू. विकास निधीचे नियोजन कसे असावे, यादृष्टीने नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आपण या चौक जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून येथे आलो आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. यापुवीर्ही बल्लारपूर विकास परिषदेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधुन बल्लारपूर शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)