शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा-कुणबी मूक मोर्चासाठी समित्या स्थापन

By admin | Updated: September 29, 2016 00:51 IST

राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाचे लोन चंद्रपुरात पोहोचले आहे.

चंद्रपुरात पार पडली द्वितीय बैठक : तालुकास्तरावर होणार बैठकांचे आयोजनचंद्रपूर : राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाचे लोन चंद्रपुरात पोहोचले आहे. चंद्रपुरातही १९ आॅक्टोबरला मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या आयोजनाबाबत द्वितीय बैठक चंद्रपुरातील मातोश्री विद्यालयात पार पडली. या बैठकीत अर्थसमिती, समन्वय समिती, प्रचार-प्रसार समिती, वार रुम, प्रचार कार्यालयाबद्दल समित्या स्थापना करण्यात आल्या. तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करुन तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीची तारीखही यावेळी निश्चित करण्यात आली. या बैठकीला मराठा-कुणबी समाजातील अनेकांनी उत्साहात सहभाग घेतला होता. बैठकीमध्ये १९ आॅक्टोबरला होणाऱ्या मोर्चाचे नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली. त्यामध्ये २९ सप्टेंबरला सकाळी १० वाजता राजुरा, दुपारी १२ वाजता जिवती, दुपारी ३ वाजता गडचांदूर, ३० ला सकाळी १० वाजता गोंडपिंपरी, दुपारी १२ वाजता पोंभूर्णा, सायंकाळी ५ वाजता मूल, सायंकाळी ७ वाजता सिंदेवाही तर १ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता नागभीड, दुपारी १२ वाजता ब्रह्मपुरी, दुपारी ३ वाजता चिमूर, सायंकाळी ७ वाजता सिंदेवाही व २ आॅक्टोबरला दुपारी १२ वाजता भद्रावती, दुपारी ४ वाजता वरोरा येथे बैठकांचे आयोजन करण्याचे ठरले. या मोर्चामध्ये १० लाख नागरिक सहभागी होण्याची शक्यता मान्यवरांनी यावेळी दर्शविली. या मोर्चासाठी मराठा-कुणबी समाजातील सर्व बांधवांनी सर्वोतोपरी मदत करावी, असे आवाहन मराठा- कुणबी क्रांती मूक मोर्चाच्या सदस्यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)