शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

चांदा ते बांदा विकासासाठी समिती गठित

By admin | Updated: August 22, 2015 01:30 IST

चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधन संपत्तीचे परिणामकारक नियोजन करुन सर्वंकष विकास करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर ...

अर्थराज्यमंत्री समितीचे अध्यक्ष : तीन महिन्यात समिती देणार अहवालचंद्रपूर : चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधन संपत्तीचे परिणामकारक नियोजन करुन सर्वंकष विकास करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रिसोर्स बेस्ड डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यासाठी अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. नियोजन विभागाने यासंबंधीचा शासन आदेश गुरूवारी २० आॅगस्टला निर्गमित केला.महाराष्ट्राच्या दोन टोकावरील चंद्रपूर व सिंधुदुर्ग या खनिज व नैसर्गिक संपत्तीचे वरदान लाभलेल्या जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्तीचा इष्टतम वापर व्हावा, यासाठी सधन नियोजन व अंमलबजावणीचा विशेष कार्यक्रम राबविल्या जाईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिले होते. त्यानुषंगाने या दोन्ही जिल्हयातील वन संपत्ती, पर्यटन, मत्स्य उत्पादन, फलोत्पादन इत्यादी साधन संपत्तीवर आधारित उद्योग, रोजगार, कृषी, मत्स्य संवर्धन, पशु संवर्धन, प्रक्रिया उद्योग, पर्यटन, वनउपज आधारित उद्योग, महिला बचत गट सक्षमीकरण, कौशल्यवृध्दी कार्यक्रमातंर्गत रोजगार निर्मिती अशा जिल्ह्यातील सर्व योजना व कार्यक्रमांची सांगड घालून जिल्ह्याच्या विकासाचे मॉडेल तयार करण्याचे काम ही समिती करणार आहे.पर्यटन, फलोत्पादन, जलसंधारणाचे विविध उपक्रम राबविणे, उद्योग व खनिज, ग्रामविकास व दारिद्रय निर्मूलन, कृषी, मत्स्य उद्योग व संलग्न, वन व वनोत्पादन पदार्थ या विकास क्षेत्रांसाठी यथार्थदर्शी योजना तयार करण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. या समितीत अप्पर मुख्य सचिव परिवहन, अपर मुख्य सचिव कृषी, अपर मुख्य सचिव वित्त, अप्पर मुख्य सचिव नियोजन, प्रधान सचिव पर्यावरण, प्रधान सचिव ग्रामविकास, सचिव उद्योग, सचिव वने, सचिव जलसंधारण व रोहयो, सचिव रस्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी मेरीटाईम बोर्ड, संचालक महाराष्ट्र रिमोट सेसिंग सेंटर नागपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर व जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग हे सदस्य राहणार असून राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समितीचे सदस्य सचिव राहतील. बीएआयएफचे अध्यक्ष जी.जी. सोहनी, जैव विविधता मंडळाचे माजी अध्यक्ष तथा भारतीय विद्यापीठ जैव विविधता विभाग प्रमुख डॉ. भरुचा, विज्ञान व तंत्रज्ञान पार्क केंद्र शासन प्रमुख श्रीजगदाळे, बुलडाणा येथील नासाचे माजी शास्त्रज्ञ बाळासाहेब दराडे यांचा समितीत विशेष निमंत्रित म्हणून समावेश आहे. (प्रतिनिधी)