शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृहाच्या मागणीसाठी आयुक्तांना निवेदन

By admin | Updated: January 15, 2017 00:50 IST

शहरातील व्यवसायिक व गर्दीच्या ठिकाणी चंद्रपूर महानगरपालिकेने महिलांकरिता स्वच्छतागृह उभारून द्यावीत, ..

चंद्रपूर : शहरातील व्यवसायिक व गर्दीच्या ठिकाणी चंद्रपूर महानगरपालिकेने महिलांकरिता स्वच्छतागृह उभारून द्यावीत, या मागणीचे निवेदन काँग्रेसच्या माजी प्रदेश सचिव सुनिता लोढीया यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर मनपाचे आयुक्त संजय काकडे यांना शुक्रवारी देण्यात आले.मागील तीन दिवसांपासून चंद्रपूर शहराची पाहणी करण्याकरिता केंद्रीय समिती आलेली आहे. त्या समितीद्वारे स्वच्छ चंद्रपूर, सुंदर चंद्रपूर शहराची पाहणी करून पुरस्कारासाठी गुण देणार आहेत. मात्र, महिलांना ५० टक्के आरक्षण असुनसुद्धा सार्वजनिक व व्यवसायिक जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नाही. याबाबत महिलाकडून वारंवार मागणी करूनही स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे शहर स्वच्छ व सुंदर करून चालणार नाही, तर महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे, यासाठी महिलांनी चंद्रपूर महानगरपालिकेसमोर निदर्शने केली व त्वरित स्वच्छतागृह उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले.याप्रसंगी माजी प्रदेश सचिव सुनिता लोढीया, प्रदेश सचिव डॉ. आसावरी देवतळे, ज्योती कवठेकर, वंदना भागवत, शालिनी भगत, मुमताज शेख, रितू गजबाटे, कविता मानकर, संगीता पाल, रूहीना शेख, पु्ष्प वडस्कर, मीना मत्ते, दुर्गा धानोरे, अर्चना उचके, भाग्यश्री रगडे, सुनंदा कोवले, माया तरारे, वैशाली पोहनकर, दुर्गा वैरागडे, कविता काहोले, चंदा कुळमेथे, रेवती उपरे, राधिका पेंदाम आदी महिला उपस्थित होत्या.(नगर प्रतिनिधी)