शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कमिशनचा वाद आला चव्हाट्यावर

By admin | Updated: May 16, 2016 00:52 IST

गेल्या काही महिन्यांपासून येथील नगरपालिकेत कमिशनचा वाद चांगलाच गाजत आहे.

वरोराच्या नगराध्यक्ष नामधारी : कंत्राटदाराने सादर केले कमिशन मागितल्याचे पुरावेवरोरा : गेल्या काही महिन्यांपासून येथील नगरपालिकेत कमिशनचा वाद चांगलाच गाजत आहे. त्यातच येथील नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांनी एका कंत्राटदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून येथील नगर पालिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांनी ज्या कंत्राटदाराविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली, त्या अमोल सोनेकर यांनी रविवारी सायंकाळी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात स्वीकृत सदस्य राजू महाजन यांनी कमिशन मागितल्याचे व्हिडिओ आणि आॅडिओ क्लीप सादर करून चांगलीच खळबळ उडवून दिली. स्वत:च्या स्वार्थासाठी सर्वकाही करायला तयार असणारे अधिकारी आणि पदाधिकारी वरोरा नगरपालिकेला मिळाले, हे वरोऱ्याच्या जनतेचे अहोभाग्यच आहे, असे आता उपहासाने नागरिक बोलू लागले आहे. गेल्या चार दिवसापासून वरोरा नगरपालिकेतील राजकारण चांग राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वरोराच्या नगराध्यक्षा जनाबाई मंगल पिंपळशेंडे यांनी एका कंत्राटदाराविरूद्ध वरोरा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली. त्यावरून चांगलाच वादंग माजला आहे. हा सर्व प्रकार कमिशनच्या देवाणघेवाणीवरूनच झाल्याचे वास्तव आता समोर येऊ लागले आहे. त्यामुळे आता नगरपालिकेतील पुढाऱ्यांचे खरे चेहरे उघड झाले आहेत. काही वर्षांआधी निवडणुकीदरम्यान मालविय वॉर्डातीलच प्रशांत डफ नावाच्या व्यक्तीच्या पत्नीने विद्यमान नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. त्यानंतर काही दिवसात जनाबाई पिंपळशेंडे यांनी डफ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली होती. पोलिसांवर राजकीय दबाव आणून प्रशांत डफ यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले होते. जनाबाई पिंपळशेंडे यांच्या वॉर्डातच राहणाऱ्या एका सामान्य अशिक्षित अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या विरोधात अशाच प्रकारची तक्रार दबाव आणून नोंदविण्यात आली होती. मालविय वॉर्डातील अतिक्रमित जागेत देवालय बांधण्यात आले. या मंदिरात सर्व जातीच्या भक्तांना प्रवेश असतानाही या गरीब अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या मुलाला या मंदिरात मज्जाव करण्यात आला होता. यातूनच नवीन वादाला तोंड फुटले होते. साईचे मंदिरात सर्व जाती-धर्माच्या लोकांना प्रवेश असतो. प्रत्येक जण साईबाबांना आपले दैवत मानतात. साईबाबांनीही सर्व धर्माची शिकवण देत उचनीचतेचा भेदभाव विसरून आपण सारे देवाचीच लेकरे आहोत, असा संदेश दिला. मात्र जनाबाई पिंपळशेंडे यांच्या राजकीय दबावामुळे सामान्य व्यक्तींना पोलीस ठाण्याचे उंबरठे ओलांडावे लागले. मात्र या प्रकरणात न्यायालयात धाव घेण्यात आली. त्यातून मालविय वॉर्डात बांधण्यात आलेले हे मंदिर अनधिकृत असल्याने ते पाडण्याचे आदेश देण्यात आले. तसेच लावण्यात आलेले आरोप न्यायालयासमोर सिद्ध न झाल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)जीवे मारण्याच्या धमक्याकंत्राटदार अमोल सोनेकर यांनी पत्रकार परिषदेत व्हिडिओ आणि आॅडिओ क्लीप दाखविली. राजू महाजन यांनी आपल्याला कमिशन मागितल्याचा दावा सोनकर यांनी केला. आता आपल्याला त्यांच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असून त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.