शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

खंजर मोहल्ल्यात दारूविरुद्ध कोम्बिंग आॅपरेशन

By admin | Updated: June 8, 2015 01:53 IST

शहरातील अवैध दारू विक्रीचे प्रमुख केंद्र असलेल्या खंजर मोहल्ला जलनगर परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या आदेशाने

संतोष कुंडकर चंद्रपूरशहरातील अवैध दारू विक्रीचे प्रमुख केंद्र असलेल्या खंजर मोहल्ला जलनगर परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या आदेशाने रविवारी सकाळी शहर व रामनगर पोलिसांनी अचानक कोंबींग आॅपरेशन राबविल्याने या भागातील दारू विक्रेत्यांची चांगलीच भंबेरी उडाली. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत राबविलेल्या या शोध मोहिमेत दोन लाख ९ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या कार्यकाळातील दारू विरुद्धची पहिलीच मोठी कारवाई आहे. अजुनही शहरात मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा असण्याची शक्यता असून ते पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत अवैध दारू विक्रीबाबत चर्चा करून कारवाई करण्याचे निर्देश नुकतेच दिले होते. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाणी हेदेखील स्वत: अवैध दारू विक्रीच्या विरोधातील कारवाईसाठी आग्रही होते. त्यांनी पत्रकारांकडून दारू विक्रीच्या संदर्भात माहितीही जाणून घेतली होती. आता पोलिसांवरही होणार कारवाईदारूबंदीनंतर काही दारूविक्रेत्यांनी त्या-त्या बिटातील पोलिसांशी संधान साधून दारू विक्रीचा धंदा आरंभला. ‘तुम्ही मारल्या सारखे करा-आम्ही रडल्यासारखे करतो’ असा करारच पोलीस व दारू विक्रेत्यांमध्ये झाला. जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून कारवाईचा ‘दट्टया’ आला की, नाममात्र कारवाई करायची. दारू विक्रेत्याला पकडायचे. काही दारू जप्त करायची, अशी सारी नौैटंकी सुरू आहे. त्यामुळेच जिल्ह्यात दारूबंदीचा फज्जा उडाला. ही बाब लक्षात आल्याने येथे नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाणी यांनी आता भ्रष्ट कर्मचाऱ्यांनाही टार्गेट केले आहे. जो कर्मचारी दारू विक्रेत्याशी संधान साधून काम करेल, त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर एक थेंबही दारू विकली जाणार नाही, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र हा दावा फोल ठरला. आठ-दहा दिवसानंतरच्या शांततेनंतर दारू विक्रेत्यांनी डोके वर काढले. गरजवंतांना दामदुपटीने दारू विकणे त्यांनी सुरु केले. पोलिसांच्या आशीर्वादानेच दारू विक्री सुरूदारूच्या विरोधात महिलांच्या आंदोलनाला वित्तमंत्री सुधीर मुनंगटीवार यांचे पाठबळ मिळाल्याने १ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी झाली. मात्र ही दारूबंदी केवळ ‘फार्स’ ठरावी, अशी जिल्ह्यात स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अनेक ठिकाणी तपासणी नाके उघडण्यात आलेत. मात्र हे नाके तैनात पोलिसांसाठी ‘कुरण’ ठरत आहेत. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी केली जात आहे. शहरातही मोठ्या प्रमाणात दारू येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरेच दारूबंदी झाली की, दारूबंदीचा फार्स सुरू आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. शेकडो पोलिसांचा सहभागखंजर मोहल्ला जलनगर परिसरात अवैध दारू विक्रीच्या विरोधात यापूर्वी कारवाई करताना आलेला ‘कटू’ अनुभव लक्षात घेता रविवारी केलेल्या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांच्या नेतृत्वात ९५ पोलीस शिपाई, तीन पोलीस उपनिरीक्षक, एक महिला पोलीस उपनिरीक्षक, सी-६० पथक, आर.सी.बी पथक व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी त्यांच्या रडारवर असलेल्या प्रत्येक दारू विक्रेत्याच्या घरांची झडती घेतली. तसेच तलाव परिसरातील झुडपांमध्येही दारूच्या साठ्यांच्या शोध घेतला. या मोहिमेत एकूण दोन लाख नऊ हजार २०० रुपये किंमतीची दारू पोलिसांनी जप्त केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली.जलनगर परिसरात मद्यपींची गर्दीजिल्ह्यातील दारूबंदीनंतर अवैध दारू विक्रीचे मुख्य केंद्र बनलेल्या खंजर मोहल्ला जलनगर परिसरात दररोजच मोठ्या प्रमाणावर मद्यपींची गर्दी उसळते. तिप्पट किंमतीने दारू विकली जात असली तरी दारूच्या आहारी गेलेले लोक घरावर तुळशीपत्र ठेवून दारू पिण्यासाठी या परिसरात गर्दी करतात. दारूबंदीनंतर काही दिवस या भागात पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र पोलिसांच्या डोळ्यादेखतच ही दारू विक्री सुरू होती. पुढे हे तैनात पोलीस तेथून बेपत्ता झालेत. महिलांच्या तक्रारीवरून झाली कारवाईजिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतरही चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. शहरातील खंजर मोहल्ला जलनगर हे दारू विक्रीचे मुख्य केंद्र असून या भागात तिप्पट किंमतीने दारू विक्री सुरू आहे. यासंदर्भात नागरिकांच्या, विशेषत: महिलांच्या तक्रारी वाढताच, पोलीस अधीक्षक संदीप दिवाणी यांनी तक्रारींची दखल घेऊन रामनगर व शहर पोलीस ठाण्यांना खंजर मोहल्ला जलनगर परिसरात रविवारी सकाळी ‘सर्च’ आॅपरेशन राबविले.